Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

चोरीच्या आरोपातून पारधी वस्तीवर जमावाचा हल्ला


चोरीच्या आरोपातून पारधी वस्तीवर जमावाचा हल्ला

दोनवर्षीय मुलाचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी

 गावालगत असलेल्या वस्तीवरील पारधी समाजाच्या कुटुंबावर चोरीच्या आरोपातून चाळीस ते पन्नास जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे रविवारी पहाटे उघडकीस आली.

 हल्लय़ामध्ये दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी आणखी एका चार वर्षांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्य़ातील पारनेर (ता. पाटोदा) येथे रविवारी पहाटे पारधी समाजाच्या वस्तीवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. चाळीस ते पन्नास जणांनी केलेल्या हल्लय़ात मानू अरुण काळे (वय २) याचा मृत्यू झाला असून प्रिन्स अरुण काळे (वय ४) याची प्रकृती चिंताजनक आहे.

तर  छबाना अरुण काळे, विधी भोसले, अभिमान काळे, देवराबाई काळे, वनिता भोसले, करिना चव्हाण, तारामती काळे, सोजरबाई भोसले यांच्यासह अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठ दिवसांपूर्वी अरुण काळे याने गावातील एका व्यक्तीला मारहाण केली होती. त्यामध्ये तो जखमी झालेला असून त्याच्यावर बीडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच कारणावरून जमावाने पारधी कुटुंबावर चोरीचा आरोप करत हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील चाळीस ते पन्नास जणांनी आमच्या कुटुंबावर हल्ला करत घरे पेटवून दिली. आमच्यापैकी तिघे जण अजूनही बेपत्ता असल्याचा आरोप जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींनी केला. मानू काळे याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करत नातेवाईक आक्रमक झाले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा