Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूरातील कळसवली, चुनाकोळवण-निवखोलवाडी रस्त्यानजीक महानेटने खोदलेल्या चरांमध्ये पाळीव प्राणी पडून त्यांना होतेय गंभीर दुखापत


 राजापूरातील कळसवली, चुनाकोळवण-निवखोलवाडी रस्त्यानजीक महानेटने खोदलेल्या चरांमध्ये पाळीव प्राणी पडून त्यांना होतेय गंभीर दुखापत


पंचायत समिती सदस्य प्रतिक मटकर यांनी उठवला आवाज


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर तालुक्यातील कळसवली, चुनाकोळवण-निवखोलवाडी रस्त्यानजीक महानेटने खोदलेल्या चरांमध्ये पाळीव प्राणी पडून त्यांना गंभीर दुखापत होत आहे. हे एक प्रकारे शेतक-यांचे नुकसानच आहे. याबाबत राजापूर पंचायत समितीचे सदस्य प्रतिक मटकर यांनी आवाज उठवला आहे. 

महानेट कंपनीने सदर रस्त्यावर पोल टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगी न घेता ठिकठिकाणी चरी मारलेल्या आहेत. सदर चरिंमध्ये पाळीव प्राणी पडत असून भविष्यात मनुष्य हानीही होऊ शकते. याबाबत पंचायत समिती सदस्य प्रतिक मटकर यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग राजापूरकडे पत्रव्यवहार केला होता. याला अनुसरुन जिल्हा परिषद बांधकाम उपविभाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहारामध्ये सदरचे चर विनापरवाना पाडण्यात आलेले असून ते चर त्वरित बुजवून संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात यावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीवर रत्नागिरी जिल्हा परिषद कारवाई करणार का? की केवळ पत्रव्यवहाराचा फार्स करणार असा सवाल प्रतिक मटकर यांनी उपस्थीत केला आहे.

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा