Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

नाचणे,सुपलवाडी गणपती विसर्जन घाट काम पूर्ण...


  नाचणे,सुपलवाडी गणपती विसर्जन घाट काम पूर्ण...


ना.उदय सामंत यांनी नाचणे ग्रामस्थांची केली मागणी पूर्ण

उद्योजक श्री आर.डी. सामंत यांचे शुभहस्ते उदघाटन संपन्न...

रत्नागिरी: नाचणे सुपलवाडी  परिसरातील अनेक घरगुती गणपतींचे विसर्जन आजपर्यंत या ठिकाणी केले जात आहे ,या नयनरम्य परिसरामध्ये काही सुविधा तसेच या ठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग बांधण्याची मागणी स्थानीक ग्रामस्थानी केली होती,सरपंच श्री भैय्या भोंगले यांनी ही मागणी लक्षात घेऊन ना.श्री उदय सामंत साहेब यांचे जवळ सदर कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.नामदार उदय सामंत साहेबानी देखील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन नाचणे सुपलवाडी गावातील गणपती विसर्जन घाट या कामाला

जिल्हा वार्षिक योजनेमधील नागरीसुविधा योजने अंतर्गत 20 लक्ष निधी मंजूर करून दिला.आज हे काम पूर्णत्वास गेले असून या कामाचे  उदघाटन उद्योजक  श्री आर डी सामंत यांचे शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रम सरपंच भय्या भोंगले,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ,पंचायत समिती उप सभापती उत्तम सावंत,

उपसरपंच निलेखा नाईक,उप तालुका प्रमुख शेखर घोसाळे,BDO जाधव,प्रदीप सावंत,विजय सुपल,दीपक सुपल,प्रकाश शिंदे,विठोबा नागवेकर,प्रशांत रसाळ,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांचे उपस्थितीमध्ये पार पडला.

अतिशय नयनरम्य असे हे ठिकाण असून,गावातील एक छोटे पर्यटन स्थळ म्हणून  नावारूपाला येत आहे,अनेक लोक या ठिकाणी फिरायला येत असून वाहत्या ओढ्याच्या बाजूने  घनदाट झाडीने वेढलेला हा परिसर निसर्गरम्य ठिकाण म्हणून पर्यटकांना भुरळ घालत आहे.लवकरच या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढेल हा विश्वास सरपंच भय्या भोंगले यांनी व्यक्त केला.

..................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा