Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सत्याचा पराभव होत नाही : भुजबळ


सत्याचा पराभव होत नाही : भुजबळ

सत्याचा पराभव होत नाही : भुजबळ


   ‘सत्याचा कधी पराभव होत नाही’  अशा शब्दांत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी न्यायालयाने दोषमुक्त के ल्यानंतर प्रतिक्रि या व्यक्त के ली.  द्वेषबुद्धीने आपल्याला बदनाम करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी के ला. तर विशेष न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सामाजिक कार्यकत्र्या अंजली दमानिया यांनी जाहीर के ले.

शेवटी सत्याचाच विजय झाला, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पवारांनी आपल्याला कायमच सहकार्य के ल्याचे भुजबळ म्हणाले. राजधानी दिल्लीतील सुंदर वास्तू म्हणून महाराष्ट्र सदनाच्या इमारतीचा गौरव के ला जातो. या बांधकामातून भुजबळ कु टुंबीयांनी लाच स्वीकारली किं वा विकासकाचा फायदा करून दिला, असे आरोप झाले होते. हे सारे आरोप खोटे होते हेच निकालातून स्पष्ट झाले. काही लोकांनी त्रास द्यायचा हे ठरविले होते. पण त्यातून बाहेर पडलो. कोणाबद्दलही आमच्या मनात राग नाही आणि द्वेषबुद्धीही नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट के ले.

उच्च न्यायालयात दाद मागणार  : अंजली दमानिया

छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या आणि तक्रारदार अंजली दमानिया यांनी सांगितले.  दमानिया म्हणाल्या, भुजबळ व अन्य आरोपींच्या निर्दोष मुक्ततेविरोधात राज्य सरकार व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयात अपील केले पाहिजे. महिनाभरापूर्वी या प्रकरणातील काही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू नये, अशा सूचना विधि व न्याय खात्याकडून संबंधितांना देण्यात आल्या असल्याचे समजते. आता भुजबळ व इतरांची मुक्तता झाली आहे. सर्वच आरोपींविरुद्ध राज्य सरकारने अपील करण्याची भूमिका घ्यायला हवी.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा