Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

करोना संसर्गाचे गर्भवती महिलांवर गंभीर परिणाम; ICMR च्या अहवालामधून धक्कादायक खुलासा


Record assistance of Rs1000 crore to pregnant women
Advertisement

करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान संसर्ग झालेल्या ४ हजारहून अधिक गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या स्त्रियांवर अभ्यास करण्यात आला. त्यात असे दिसून आले आहे, की त्यापैकी कमीतकमी १६.३ टक्के महिलांची प्रसूती मुदतीपूर्व झाली. तर, १०.१ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये गुरुवारी प्रकाशित झाला आहे. यामध्ये लेखकांनी करोना साथीच्या पहिल्या लाटेत १ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान प्रेगकोविड रजिस्ट्रीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील १९ ठिकाणी ४२०३ गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांवर अभ्यास केला आणि त्याचं विश्लेषण केलं.

करोनाचा वाढता धोका आणि भारतातील गर्भवती महिलांच्या आरोग्यावर करोनाचा होणारा परिणाम, यासंदर्भातील डेटाची गरज लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग (MEDD), महाराष्ट्र आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ (NIRRH) यांनी संयुक्तपणे PregCovid रजिस्ट्री केली होती. PregCovid रजिस्ट्री महाराष्ट्रातील गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या स्त्रियांची १९ वैद्यकीय महाविद्यालयांमधून करोनाच्या प्रयोगशाळेद्वारे पुष्टी केलेली माहिती गोळा करते. पहिल्या लाटेत राज्य वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणि मुंबईतील बीवायएल नायर रुग्णालयातील ४२७६ गर्भवती आणि प्रसूतिपश्चात महिलांच्या डेटाचे विश्लेषण करून आयजेएमआरमध्ये प्रकाशित करण्यात आले.

एकूण १५८ गर्भवती आणि प्रसूतीपश्चात महिलांना अतिदक्षतेची गरज भासली. त्यापैकी १५२ महिलांना करोनामुळे ही गरज भासली. करोना असलेल्या ४२०३ गर्भवती महिलांपैकी, एकूण १५ महिलांना एक्टोपिक गर्भधारणा होती. ७७ महिलांचे गर्भपात झाले आणि ८३४ महिला गर्भवती होती. या काळात गर्भाच्या नुकसानाचे प्रमाण स्थिर जन्मासह सहा टक्के होते, असे अभ्यासात म्हटले आहे. एकूण महिलांपैकी ३४४१ महिला १८ ते ३० वयोगटातील होत्या आणि त्यापैकी ९२ टक्के महिला गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीत होत्या. अशक्तपणा, क्षयरोग आणि मधुमेह मेलेट्सचा त्रास असलेल्या महिलांना मृत्यूचा धोका जास्त असतो. गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या महिलांमध्ये एकूण मृत्यू दर ०.८ टक्के होता. प्रसूतीनंतरच्या ३४ मातांपैकी १० जणांचा मृत्यू झाला. तर, ५२८ जणांची वेळेआधी प्रसुती झाली. तर, ३२८ महिलांना गर्भधारणेदरम्यान हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर होते.

अभ्यासातील निष्कर्षानुसार, १७१९ स्त्रियांची प्रसूती सामान्य झाली. तर, १५३१ जणांची प्रसूती सिझेरियनद्वारे झाली. ३२१३ बाळांचा जीवंत जन्म झाला. त्यापैकी ३१८९ बाळं एकटी जन्माला आली. ६० जुळे आणि एका महिलेला तिळे मुलं झालीत.  “करोना झालेल्या बहुतांशी महिलांना लक्षणं नव्हती. ३६६९ पैकी केवळं ५३४ महिलांना करोनाची लक्षणं दिसत होती,” असे या लेखाचे सह-लेखक आणि जेजे हॉस्पिटलचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राकेश वाघमारे यांनी सांगितलं.

केवळ ५३४ महिलांना करोनाची लक्षणं होती. त्यापैकी ३८२ महिलांना सौम्य, ११२ मध्यम आणि ४० महिलांना गंभीर लक्षणं होती. या अभ्यासात विदर्भात (९/११५५, ०.८%), मुंबई महानगर (११/१६८४,०.७) आणि आणि खानदेश (१/१६०, ०.६%) च्या तुलनेत पुणे (९/८५३, १.१%), मराठवाडा (४/३५१, १.१%) क्षेत्रांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

.......................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा