Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

MHT CET Exam Dates 2021: ‘सीईटी’ १५ सप्टेंबरपासून


MHT CET Exam Dates 2021: ‘सीईटी’ १५ सप्टेंबरपासून

MHT CET Exam Dates 2021: ‘सीईटी’ १५ सप्टेंबरपासून


१ नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा


 अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, एमसीए, एमबीए, आर्किटेक्चर, बीएड आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा होईल. तसेच महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी के ली.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रि या ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु, करोनामुळे बारावीच्या परीक्षांबरोबरच ‘सीईटी’ परीक्षांचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्र मांच्या मिळून १४ वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा २५ दिवसांत होणार आहेत. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात बीई/बीटेक, बीफार्म, डीफार्म, शेती आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांची ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा देतील. या परीक्षेला ५ लाख ५ हजार ७८८ विद्यार्थी बसणार आहेत. तर हे आणि इतर सर्व अभ्यासक्रमांचे मिळून ८,५५,८७९ विद्यार्थी विविध अभ्यासक्रमासाठी परीक्षा देणार आहेत. या परीक्षांसाठी राज्यभरात २२६ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेसाठी रोज २५ हजार संगणकांची गरज आहे. खबरदारी म्हणून ५० हजार संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे सामंत म्हणाले.

परीक्षांचे वेळापत्रक..

एमसीए, एम.एचएमसीटी, एम.आर्क, एम.पी.एड, बीए/बीएससी आणि बीएड  : १५ सप्टेंबर

एम.पी.एड (शारीरिक चाचणी) : १६ ते १८ सप्टेंबर

एमबीए, एमएमएस : १६ ते १८ सप्टेंबर

बीई/बीटेक, बीफार्म, डीफार्म, अ‍ॅग्रीकल्चर : २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर

बी.एचएमसीटी, एम.एड, बी.एड आणि बी.पी.एड, एलएलबी (५वर्षे) : ३ ऑक्टोबर

बीपीएड (शारीरिक चाचणी) : ४ ते ७ ऑक्टोबर

एलएलबी (३ वर्षे) : ४ आणि ५ ऑक्टोबर

बीएड (जनरल आणि स्पेशल) : ६ आणि ७ ऑक्टोबर

फाईन आर्ट (ऑफलाईन) : ९ आणि १० ऑक्टोबर

शिष्यवृत्ती निकषात बदल..

राज्य सरकारतर्फे  परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व संशोधन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकी १० याप्रमाणे २० विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी आतापर्यंत २० लाख रुपये इतकी उत्पन्नाची मर्यादा होती. ती आता कमी करून ८ लाख इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल, अशी माहिती  सामंत यांनी दिली.

होणार काय?   १५ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना ‘सीईटी’ द्याव्या लागणार आहेत. या सर्व सामाईक परीक्षांना सुमारे ८ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्व सीईटी परीक्षांचे निकाल २० ऑक्टोबपर्यंत जाहीर के ले जातील. तसेच लवकरात लवकर प्रवेश प्रक्रि या पूर्ण करून १ नोव्हेंबपर्यंत महाविद्यालये सुरू करण्यात येतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा