Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

जयगड रस्त्यावरील ओरलोड गाड्यावर कारवाई करण्यास रत्नागिरी RTO उदासीन:- रमजान गोलंदाज




 जयगड रस्त्यावरील ओरलोड गाड्यावर कारवाई करण्यास रत्नागिरी RTO  उदासीन:-  रमजान गोलंदाज


स्थानिकांना त्रास आणि जिल्हा बाहेरील ओरलोड वाल्यांना सूट :नेमकी ऑफर तरी कुठली

जिंदाल, चौघुले कंपनीच्या ओरलोड गाड्यामुळे भरपावसात रस्त्यांची चाळणं:अपघात वाढले



रत्नागिरी प्रतिनिधी

               निवळी जयगड रस्तावर जिंदालची कंपनीला जाणारी वाहने ही ओरलोड असून यांच्यावर कारवाई करण्यासाठी आर. टी. ओ. कडे गेली 7-8 मागणी करत असताना रत्नागिरी आर. टी. ओ. कडून याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असून भर पावसात या मार्गांवर जिंदाल, चौघुले कंपनीची ओरलोड वाहतूक सुरु असून भरधाव वेगात असणाऱ्या या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या भागातील रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिकांना त्रास आणि जिल्ह्याबाहेरील लोकांना सुट नेमकी ऑफर तरी कुठली असा चोक सवाल सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज  यांनी रत्नागिरी आर. टी. ओ. ला केला आहे. जिल्ह्यात ओरलोड वाहने यापुढे चालली तर संबंधित विभागा विरोधात दि.२० सप्टेंबरला  आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसे लेखी पत्राच्या माध्यमातून आर. टी. ओ. कार्यालय आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना कळविले असल्याचे  त्यांनी सांगितले.


             जयगड रस्त्यावर चालणाऱ्या ओरलोड वाहतुकीची तक्रारी केल्यावर  आर. टी. ओ. कार्यालयाला कडून   धातूर मातूर उत्तर देऊन कारवाई करू असे आश्वासन  देण्यात येतात  मात्र या कारवाईचे पुढे काय झाले हा प्रश्न अनुत्तरी राहिला असून ओरलोड वाहनावर कारवाई करण्यासाठी सबंधित विभाग का उदासीन आहे. यात शंका निर्माण होत आहे.

          जयगड-निवळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ओरलोड वाहतूक सुरु असून या रस्त्यावर अनेकांचे प्राण जातं आहेत. या वाहतुकीमुळे अपघात वाढले असून रस्त्याची ही अवस्था बिकट होत आहे. 

           जिंदाल व चौघुले या कंपनी मध्ये होत असणारी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे असून आमच्या स्थानिक लोकांवर कारवाई करण्यासाठी संबंधीत विभागाला वेळ आहे मग या ओरलोड गाड्यावर कारवाई करण्यास का चाल ढकल होत आहे?. यामध्ये कुठे पाणी मूरतय? असे अनेक विषय पुढे येत आहे.वेळोवेळी पत्र व्यवहार करून संबंधित विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.माळीच्या गाड्या बाहेरील जिल्ह्यातून येऊन येथे ओरलोड पणे चालवतात त्याना आर. टी. ओ. सुट देते आणि जिल्ह्यातील लोकांना कारवाई कुणालाच माफी नाही. त्वरित ओरलोडवर कारवाई करा अन्यथा होणाऱ्या सामन्याला तैय्यार रहा अश्या सूचना वजा ईशारा रमजान गोलंदाज यांनी दिला आहे. दि.१८ सप्टेंबर पर्यत कारवाई न झाल्यास दि.२०  रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे कळविले आहे.


..............................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा