महाराष्ट्र शासनाच्या नियम आदेशानूसार महाविद्यालय नियमित ऑफलाइन मोडवर करण्याचे आदेश आल्यानंतर कोविड महामारीच्या प्रतिकारासाठी लसीकरण आवश्यक असल्याने वरिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय मध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली.कला,वाणिज्य,विज्ञान शाखेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. भारत सरकारच्या शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याच्या दिवशी गोगटे जोगळेकर महाविद्यालय मध्ये सुद्धा लसीकरण मोहीम राबवून भारत सरकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले. लसीकरणासाठी डॉ. अश्विनी निकम परिचारिका नेहा कराडकर आणि सोनल ठीक यांचे सहकार्य लाभले श्री सुभाष गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरणाची मोहीम राबवण्यासाठी महाविद्यालयातर्फे डॉ. विवेक भिडे आणि डॉ.आनंद आंबेकर यांनी समन्वयाचे काम पाहिले. विद्यार्थ्यां तर्फे विद्यार्थी सचिव बुशरा खान, शुभम शिवलकर,पर्णिका तिवरेकर ,गायत्री भुवड,यश सुर्वे,सिद्धी गुरव,शिवानी भडेकर,संघमित्रा कांबळे,श्रद्धा गवळी,नंदिनी गवळी यांनी व्यवस्थापनाचे काम पाहिले. सदर विद्यार्थ्यांच्या संपर्कासाठी तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई,डॉ. अपर्णा कुलकर्णी डॉ. यास्मिन आवटे यांनी सहकार्य केले तसेच प्रशासनासाठी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सहकार्य केले. विद्यार्थी लसीकरण मोहिमेसाठी प्रभारी प्राचार्य प्रफुल्ल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा