
पूरग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 2 महिन्यांनी फिरकलं केंद्रीय पाहणी पथक
जुलै ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर सांगलीला पुराचा फटका बसला. त्यानंतर तब्बल 2 महिन्यांनी केंद्रीय पथकाला मिळाला. आणि ते 2 महिन्यापुर्वीच्या पूराची पाहणी करायला सांगली कोल्हापुरात पोहोचले. यामुळं शेतकरी संतप्त झाले.
आधीच महापुरामुळं सर्वस्व वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम प्रशासन केला जात आहे. गेल्या जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तब्बल दोन महिने पूरग्रस्तांनी नुकसान भरपाईसाठी वाट पाहिली.पण चार आण्याची मदत मिळाली नाही.
आता महापुराच्या सगळ्या खाणाखुणा ओसरल्यानंतर, तब्बल दोन महिन्यांनी केंद्रीय पाहणी पथक शिरोळमध्ये शेतकऱ्य़ांच्या बांधावर पोहोचलं. त्यावेळी या पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुके देऊन त्यांचं उपरोधिक स्वागत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये साधारण एकाचवेळी पूर आला. केंद्रीय समिती गुजरातमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तातडीनं गेली. मात्र कोल्हापुर आणि सांगलीत यायला त्यांनी दोन महिने लावले. केंद्रीय समितीचा हा दौरा म्हणचे वरातीमागून घोडे असल्याची टीका आता होत आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा