रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबर रोजी 'यांनी' सादर केली नामनिर्देशन पत्र
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज म्हणजेच नामनिर्देशन पत्र सादर करावयाचे होते. दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी प्राथमिक कृषी पतपुरवठा व वि.का.सेवा.सह.संस्था, तसेच धान्य अधिकोष सह.संस्था या मतदारसंघातून गजानन पाटील, आदेश आंबोळकर, रघुनाथ पोस्टुरे, प्रल्हाद शेट्ये, महेश खामकर, बाबाजी जाधव, सचिन गिजबिले यांनी नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत. महिला राखीव मधून दिशा दाभोळकर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केली आहे. कृषी पणन शेतमाल प्रक्रिया संस्था व व्यक्ती या मतदारसंघातून शेखर निकम व महेश खामकर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. औद्योगिक वाहतूक व्यवसाय, देखरेख उत्पादन सहकारी संस्था, मच्छिमार सहकारी संस्था व अन्य संस्था या मतदारसंघातून इब्राहिम दलवाई व हरेश्वर कालेकर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. आहे. मजुर संस्था, स्वयं रोजगार, बेरोजगार व हमाल कामगार सहकारी सन्स्था या मतदारसंघातून राजेंद्र घाग यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. आहे. कुक्कुटपालन, शेळी, मेंढी पालन संस्था या मतदारसंघातून अमजद बोरकर व विवेक सावंत यांनी नामनिर्देशन पत्र सादर केली आहेत. राखीव ज) 1 अ अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील सदस्य या मतदारसंघातून जयवंत जालगावकर यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व नागरी सहकारी बँका या मतदारसंघातून नित्यानंद दळवी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. राखीव मतदारसंघ- इतर मागासवर्गातील सदस्य या मतदारसंघासाठी रविकांत रुमडे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा