Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरीतील मालगूंड ग्रामपंचायत येथे मोफत डिझीटल स्वाक्षरीत 7/12 चे वितरण
 रत्नागिरीतील मालगूंड ग्रामपंचायत येथे मोफत डिझीटल स्वाक्षरीत 7/12 चे वितरण


रत्नागिरी प्रतिनिधी:-

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यशासनाने राज्यातील सर्व खातेदारांना मोफत घरपोच 7/12 देण्याची महत्वपुर्ण घोषणा केली आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी राज्यभर करण्यात आला. रत्नागिरी तालुक्यात तालुक्याचा मुख्य कार्यक्रम मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये पार पडला. यावेळी शासनाच्या “सबकी योजना सबका विकास”  या कार्यक्रमाचा सुध्दा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यात एकुण 37 ठिकाणी असा कार्यक्रम घेण्यात आला आणि आज प्रत्यक्ष 779 खातेदारांना डिझीटल स्वाक्षरीत 7/12 चे मोफत वितरण करण्यात आला.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासुन पुढील दोन महिने तालुक्यातील सर्व कृषक खातेदारांना डिझीटल स्वाक्षरीत 7/12 मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर “सबकी योजना सबका विकास” या कार्यक्रमातंर्गत महसुल विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या ऑनलाईन सेवांची माहिती देण्यात येणार आहे. आज मुख्य तालुकास्तरीय कार्यक्रम मालगुंड ग्रामपंचायत हॉलमध्ये मा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी डॉ. विकास सुर्यवंशी, मालगुंड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मा साधनाताई साळवी, मालगुंड ग्रामपंचायत सरपंच श्री दुर्गवळी, उपसरपंच श्री अमित पाटील व मालगुंड ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन मा उपविभागीय अधिकारी, जि.प सदस्या, तहसीलदार रत्नागिरी श्री शशिकांत जाधव, सरपंच श्री दुर्गवळी, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी शासनाच्या महत्वाकांक्षी अशा “ई पीक पाहणी”  प्रकल्पाची माहिती व त्याची उपयुक्तता आणि ई पीक पाहणी मोबाईल अ‍ॅप द्वारे कसे करावे याबाबत सविस्तर माहिती मालगुंड सजाचे तलाठी श्री रोहित पाठक यांनी उपस्थित नागरीकांना दिली आणि जास्तीत जास्त नागरीकांनी या अ‍ॅपचा वापर करुन 14 ऑक्टोबरपर्यत आपल्या शेतातील पिकाचे ई पीक पाहणी करण्याचे आवाहन केले आणि याबाबत काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. त्यानंतर मालगुंड मंडळाचे मंडळ अधिकारी श्री. सुरेंद्र कांबळे यांनी 1 ऑगस्ट 2020 ते 31 जुलै 2021 या महसुली वर्षात किती विनातक्रार फेरफार निर्गमीत करण्यात आले याबाबत माहिती दिली. श्री कांबळे यांनी सांगितले की, मालगुंड मंडळात एकुण 16 गावे आहेत आणि या सर्व गावांमध्ये मिळुन एका वर्षात 1053 इतके फेरफार घेण्यात आले आणि त्यापैकी 987 इतके फेरफार निर्गत करण्यात आलेले आहेत आणि आज रोजी फक्त 66 इतकेच फेरफार प्रलंबित आहेत आणि त्यापैकी  4 फेरफार हे तक्रारी स्वरुपाचे आहेत आणि उर्वरीत फेरफार हे मुदतीतील असल्याचे सांगितले. तसेच मालगुंड मंडळात अनेक खातेदारांचे अनेक वर्षापासुन वारस तपास करण्याचे शिल्लक असल्याचे सांगितले व उपस्थित नागरीकांना कोणाचे वारस तपास करण्याचे शिल्लक असतील तर ते करुन घेण्याचे आवाहन केले.


त्यानंतर “सबकी योजना सबका विकास”  या कार्यक्रमातंर्गत महसुल विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या ऑनलाईन सेवांची माहिती रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार श्री. शशिकांत जाधव यांनी सांगितली. श्री. जाधव यांनी उपस्थितांना सांगितले की, शासनाच्या महसुल विभागामार्फत अनेक ऑनलाईन सुविधा नागरीकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची ऑनलाईन सेवा जी नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे ती म्हणजे “डिझीटल स्वाक्षरीत गाव नमुना 7/12, 8अ, फेरफार व मिळकत पत्रिका”  होय. शासनाने आता https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळावर राज्यातील सर्व 7/12, 8अ, फेरफार व मिळकत पत्रिका हे डिझीटल स्वाक्षरीत स्वरुपात नागरीकांसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. विहीत नक्कल फी भरुन कोणीही जगातुन कोठुनही आपला अधिकार अभिलेख दस्ताऐवज प्राप्त करुन घेऊ शकतात आणि हे दस्ताऐवज कोणत्याही शासकीय, कायदेशीर कामासाठी ग्राह्य असल्याचे श्री जाधव यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेकदा नागरीकांना आपला  7/12, 8अ, फेरफार व मिळकत पत्रिका फक्त पाहायचा असतो, अशांसाठी शासनाने एक संकेतस्थळ सुरु केलेली असुन याठिकाणी कोणीही राज्यातील कोणताही 7/12, 8अ, फेरफार व मिळकत पत्रिका पाहु शकतात, पण हे दस्ताऐवज शासकीय व कायदेशीर कामकाजात वैध नाहीत. असे अधिकार अभिलेख फक्त पाहण्यासाठी  https://bhulekh.mahabhumi,gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे श्री जाधव यांनी नमुद केले. त्याचबरोबर शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या “आपली चावडी”  सुविधेबद्दल माहिती देण्यात आली. शासनाच्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या संकेतस्थळावर कोणी नागरीक आपल्या गावांमध्ये किंवा आपले स्वत:चे फेरफार याची माहिती ऑनलाईन पध्द्तीने घेऊ शकतो. यामध्ये एखाद्या गावात किती फेरफार प्रलंबित आहेत, त्यांची मुदत किती आहे, नोटीशीची प्रत पाहु शकतो, फेरफारावर हरकत आली आहे काय इ माहिती घरबसल्या मिळवु शकतो. तसेच या संकेतस्थळावरुन आपल्या गावात कोणाच्या जमीनीची मोजणी कधी आहे याबाबतही माहिती मिळवु शकतात. याशिवाय शासनाने नागरीकांना घरबसल्या आपला फेरफार आपण घेण्याचे सुविधा “ई हक्क”  प्रणालीदवारे उपलब्ध करुन दिल्याचे श्री जाधव यांनी सांगितले. यामध्ये नागरीक एकुण 10 प्रकारचे फेरफार उदा. इकरार, बोजा चढविणे, कमी करणे, गहानखताची नोंद घेणे, वारस नोंद घेणे, मयताचे नांव कमी करणे, विश्वस्तांचे नांव बदलणे, अपाक शेरा कमी करणे, एकुमॅ शेरा कमी करणे, अभिलेखातील लेखनीक चुका दुरुस्तीसाठीची नोंद इ घरी बसुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन सेवांचा लाभ घेऊ शकतात व आपले कागदपत्रे सुध्दा अपलोड करु शकतात. यासाठी नागरीकांनी https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin या संकेतस्थळावर जाऊन आपला फेरफार घेऊ शकतात. याशिवाय शासनाने आपला गटबुक नकाशा, गाव नकाशा, गटाच्या चतु:सीमा पाहण्याची सोय आणि आपला सर्व्हे नंबर जिओ रेफरन्स मॅपवर पाहण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. कोणी नागरीक आपल्या गटाचा नकाशा https://mahabhunakasha,mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पाहु शकतो आणि आवश्यक तर प्रिंट सुध्दा घेऊ शकतो. या सर्व ऑनलाईन सुविधा तालुक्यातील सर्व नागरीकांना ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध असल्याचे आणि याचा सर्वानी प्रभावीपणे वापर करावा असे आवाहन तहसीलदार श्री शशिकांत जाधव यांनी या कार्यक्रमाच्यानिमित्ताने केले.


त्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित लोकप्रतिनिधी आणि नागरीकांना मोफत 7/12 चे वितरण मा उपविभागीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी साहेब, जिप सदस्या श्री साळवी मॅडम, सरपंच, उपसरपंच यांच्याहस्ते करण्यात आले आणि पुढील दोन महिन्यात सर्व खातेदारांना मोफत 7/12 चे वितरण करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी जिप सदस्या श्रीम. साळवी मॅडम यांनी शासनाच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मा उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्री. सुर्यवंशी साहेब यांनी शासनाचा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे आणि देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याने अशी मोहीम हाती घेतल्याचे सांगितले आणि शासनाची ही योजना व ऑनलाईन सेवा जास्तीत जास्त नागरीकांपर्यत पोचवण्याचे व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. त्याचबरोबर श्री सुर्यवंशी साहेब यांनी मंडल अधिकारी यांनी प्रलंबित वारस तपासाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत पुढील काही महिन्यात प्रशासनाला मालगुंडमध्ये वारस तपास मोहीमेची विशेष शिबीर घेण्याचे निर्देश दिले आणि यासाठी ग्रामपंचायतीने व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी विशेष मदत करण्याचे आवाहन केले, यावर उपस्थितांनी यांचे उस्फुर्त स्वागत व अभिनंदन केले आणि मदतीचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मंडल अधिकारी मालगुंड श्री कांबळे, तलाठी श्री पाठक, कोतवाल श्री. सुशील दुर्गवळी, ग्रामपंचायत कर्मचारी यांची मा उपविभागीय अधिकारी यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. मालगुंड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नाथाजी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि तालुकास्तरीय कार्यक्रमासाठी मालगुंड ग्रामपंचायतीची निवड केल्याबद्दल प्रशासनाचेही आभार मानले. यावेळी प्रशासनातर्फे तहसीलदार श्री शशिकांत जाधव यांनी ग्रामपंचायत मालगुंड यांनी सर्व सहकार्य केलेबद्दल, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी नाथाजी पाटील, सुत्रसंचालक श्री अंकलगेकर सर आणि सर्व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा