रत्नागिरी प्रतिनिधी:-
देवरुख नगर पंचायतीची विषय समिती निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या गटाने निर्विवाद यश संपादन केले. सदस्यांचे तौलनिक संख्याबळानुसार भाजपा गटाचे पारडे मजबूत असल्याने बांधकाम सभापती पदी संतोष कृष्णा केदारी, पाणी सभापतीपदी सौ. रेश्मा तुकाराम किर्वे, आरोग्य सभापती पदी मनसेच्या सौ.सानवी संसारे आणि स्थायी समिती थेट सदस्य म्हणून सुशांत मुळ्ये यांची बिनविरोध निवड झाली. नूतन सर्व पदाधिकारी यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्षाचे आणि वरिष्ठांचे आभार मानले आहेत. सोबत असलेल्या मनसे, रिपाई आणि अपक्ष नगरसेविका सौ वैभवी परशुराम यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
पिठासन अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी श्री. सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रसाद शिंगटे यांनी काम पाहिले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा