गोव्यात शिवसेनेला मोठा धक्का; दसऱ्या दिवशीच उपाध्यक्षानं ठोकला रामराम
पणजी – एकीकडे शिवसेना आपला दसरा मेळावा साजरा करत असताना दुसरीकडे गोव्यात सेनेला मोठा धक्का बसला आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच गोव्यातील शिवसेनेच्या उपाध्यक्षा राखी नाईक यांनी सेनेला रामराम ठोकला आहे. शिवेसेनेसाठी गोव्याच्या राजकारणात हा मोठा धक्का मानला जात आहे. राखी नाईक यांनी सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत.
राखी नाईक म्हणाल्या की, गोव्याच्या प्रश्नात शिवसेनेच्या नेत्यांना रसच नाही. गोव्यातील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना तळमळ दाखवेल, अशी अपेक्षा असल्यामुळेच आपण पक्षात प्रवेश केला होता. मात्र प्रत्यक्षात स्थिती तशी दिसली नाही, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा