अंनिसच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून विजय पोटफोडे,तर कार्याध्यक्ष म्हणून सचिन गोवळकर यांची निवड
रत्नागिरी :- अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रत्नागिरी च्या अध्यक्ष म्हणून विजय पोटफोडे, कार्याध्यक्ष म्हणून सचिन गोवळकर व प्रधान सचिव पदी सुहास शिगम , यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची देवरुख मातृमंदिर येथे बैठक झाली. या बैठकीस अंनिसचे लांजा, देवरुख, संगमेश्वर, चिपळूण, खेड, मंडणगड या तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून विलास कोलपे(देवरुख ) आणि शरयू इंदूलकर (चिपळूण ) तर बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदिप गोवळकर, विविध उपक्रम कार्यवाह भीमराव गंगणे, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प राजेश मर्चंडे, महिला सहभाग संगीता पंदिरकर, युवा सहभाग कार्यवाह अमर पवार, शोशल मिडिया व्यवस्थापन सचिन जाधव, कायदे विषयक व्यवस्थापन अशोक निकम यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी संजय भंडारे, सचिन शिर्के, मारुती काका जोशी; युयुत्स आर्ते, सतिष शिर्के, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा