साखरप्यात ३० पासून नदीची कार्यशाळेचे आयोजन
कोंडगाव येथील कबनूरकर हॉलमध्ये दि. ३० ते ३१ ऑक्टोबरला नदीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कोकणात होणारी पूरपरिस्थिती, पाणीटंचाई दूर करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा लागतो. सामुहिक प्रयत्नातून साखरपा येथे नदीची पाठशाळा उपक्रम सुरु होत आहे. काजळी नदीच्या पुरापासून साखरपा गावाला वाचवल्याने पाठशाळेचा उपक्रम लोकसहभागातून सुरू करण्यात येत आहे. श्री दत्त देवस्थान कोंडगाव अंतर्गत काजळी नदी संवर्धन प्रकल्प, गणेश मित्रमंडळ कोंडगांव, मानव लोकसंख्या यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नदीला नेमका कशा प्रकारे आजा झाला आहे. त्यावरील उपाययोजना, शास्त्रीय बाजू, तंत्र उलगडून दाखविण्याचे कार्य आदी यावेळी सांगण्यात येणार आहे.
समग्र नदी या विषयावर डॉ. अजित गोखले, नदीचे भूशास्त्र यावर डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, पंचायतराज संस्था, लोकसहभाग, कामाचा आराखडा, नियोजन योजनांचा समन्वय या विषयावर डॉ. सुमंत पांडे, वादळी, पूर, पाणीटंचाइं, अंदाज या विषयावर मयुरेश प्रभुणे मार्गदर्शन करतील. नदीची जैवविविधता या विषयावर डॉ. माधव गाडगीळ आओ नदीको जाने या विषयावर डॉ. राजेंद्र सिंह मार्गदर्शन करतील. नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा