मुंबई (शांत्ताराम गुडेकर)
कांँग्रेसचे पुर्वीचे जिल्हाध्यक्ष दिवंगत ॲड.विजय भोसले यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्ष पदावर अखेर नवीमुंबईचे माजी उपमहापौर व स्थानिक भुमिपुत्र श्री अविनाशदादा लाड यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लोकप्रिय बलाढ्य नेता मिळाला आहे.श्री अविनाशदादा लाड यांच्या निवडीनंतर मात्र जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे.
गेले अनेक दिवस दिवंगत नेते माजी जिल्हाध्यक्ष श्री भोसले यांच्या आकस्मिक निधनानंतर कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.गेली अनेक दिवस जिल्हाध्यक्ष हे पद रिक्त झाले होते.या पदावर जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी योग्य नेता कोण याची चाचपणी सुरु होती.तर काही ठिकाणी या पदासाठी रस्सीखेचही सुरु होती.या स्पर्धेत मात्र स्थानिक भुमिपुत्र श्री अविनाशदादा लाड यांनी बाजी मारली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगली उभारी मिळणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसच्या कोणत्याही पदावर नसताना त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला कडवी टक्कर दिली होती.त्यांनी केवळ एक वर्षात 52 हजारपेक्षा जास्त मते घेवून यश संपादन केले होते.त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेला हा उत्साह पाहून आज प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी नियुक्ती केली आहे.या निवडीमुळे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमय होण्यास मदत होणार आहे.श्री अविनाशदादा लाड यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटिच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.तसेच पाठींबा देणाऱ्या रत्नागिरी जिल्हयातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांचेही आभार मानले आहेत.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा