Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शब्द लहरी

 

      

 शब्द लहरी 

---------------------
 शब्द चारोळी..

शब्द शब्द जोडून मैत्री बनवली
होती, वाटले नव्हते की ती एक
चुक होती, सदाफुली नेहमीच
फुलतं होती, गुलाबाला वाटले ती
प्रेमात अडकत होती,

विद्या जाधव 
--------------------------------------------
 
 नुसतं ऐकलं की 
कितीतरी समस्या सुटतात..
ऐकवलं असता..
त्या अधिकच जटील बनतात..
सचिन वाघ साक्री.
----------------------------------
 जगण खरंच असं असतं का?

एका आईचं ताईच बाईचं.....

हवंहवंसं वाटतं ते कायम दुरदुर
पळत नको त्याच गोष्टीत का रडायचं..!

विद्या जाधव......
------------------------------------------

 रडू  कोणासाठी  मी 
  पोट माझेच  चुकलं  
  ढळली  आयुष्याची  दुपार  
 वृद्धाश्रमात मला  फेकलं  
          समाधान
----------------------------------

सदाफुली सतत ती फुलते
नाराज नाही ती कोणावर ही
पण तिचे फुलने प्रत्येकाला छळते
सतत फुलणाऱ्या मनाचे काळीज सुकते 
विद्या जाधव
------------------------------

    माझी लेखणी 
जी माणसं दुसर्‍याच्या चेहर्‍यावर 
आनंद निर्माण करण्याची क्षमता   
 ठेवतात ,त्यांच्या चेहर्‍यावरचा 
आनंद कधी कमी होत नसतो
 त्यामुळेच ती 
 माणसं नेहमीच समाधानी
 असतात . ...

कल्पना टेंभूर्णीकर नागपूर
---------------------------------
   निसर्ग

आजचे भौतिकवादी मानव आपल्या सुख-सुविधेसाठी झाडांची अंदाधुंद कापणी करीत आहे. यामुळे पृथ्वीवरील वन क्षेत्राची टक्केवारी कमी होत आहे आकडेवारीवरून असे दिसून येते की पर्यावरणीय समतोलतेसाठी पृथ्वीवरील भूभागाच्या 33 टक्के वन असणे आवश्यक आहे. झाडांची कापणी, मानवी लोकसंख्येत वाढ, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर आणि आण्विक चाचण्या आपले वातावरण दूषित करत आहेत. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. सर्वात धोकादायक गोष्ट तर अशी आहे की ओझोनच्या थराचे सतत ऱ्हास होत आहे.या संकटापासून मुक्त होण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे हाच आहे.यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. 

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
---------------------------------

 देवा कधीच कुणाच्याच 
वाट्यास नको वृध्दाश्रम!
काही नसले तरी चालेल ,
वृध्दपणी असो श्रध्दाश्रम!

कल्पना सुरेश शिंदे
--------------------------------------------

नाही मी द्रौपदी, नाही यशोदा
नाही मी सीता,नाही मी राधा 
मात्र कर्तव्य सदा निभावणार 
न्यायामधल्या मिटवून  बाधा..

सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.
-----------------------------------

 ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


तैसा  स्वधर्मु  जरी  लोपला
तरी  सर्व  सुखांचा  थारा। मोडला।  जैसा  दीपासवे  हरपला।  प्रकाशु  जाय  ।।

       जैसे  जळचरा  जळ  सांडे ।
आणि  तत्क्षणी  मरण  मांडे । हा
स्वधर्मु  तेणे  पाडे  ।  विसंबो  नये।।

         म्हणौनि  तुम्ही  समस्ती  ।आपुलालिया  कमी  उचिती । निरत  व्हावे  पुढत पुढती  । 
म्हणिपत  असे ।।


       स्वधर्माचा  लोप  झाला  म्हणजे  सुखाचे  आश्रयस्थान  नष्ट  झाले  म्हणून  समजावे  . दीप  मालवता  क्षणीच  जसा
प्रकाश ही  नाहिसा  होतो .

         ज्या  प्रमाणे  माशाला
पाण्यातून  बाहेर  काढल्या बरोबर
त्या  क्षणीच  म्रुत्यु  येतो.   त्याप्रमाणे  सर्व  धर्म त्यागाने
तुमची  स्थिती  होईल.म्हणून 
तुम्ही  कधीही  स्वधर्म  विसरू
नका .

         तुम्ही  सर्वांनी  आपापले
उचित  कर्म   आचरण्याविषयी
नेहमी  तत्पर  असावे . हेच  माझें
वारंवार  सांगणे  आहे .


सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
------------------------------------------------------
शामलाक्षरी

हवा निर्धार मनी पक्का
अपेक्षांचे ओझे नश्वर
हवा मोकळी मोहकसी
चराचरात दिसे ईश्वर॥
हवा = पाहिजे , वारा

सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment