2000 च्या हप्त्याला 6000 चा दंड; बँकांची सावकारी वसूली
रत्नागिरी, - घरामध्ये टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन किंवा मोबार्इल घ्यावा ही प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या स्वप्नापार्इ 0 टक्के व्याजाचं स्वप्न घेवून तिप्पट रक्कम बजाज फायनान्स किंवा गोल्ड लोन देणाऱ्या आयएफएल या कंपन्या दंड व बँकांच्याकडून परत परत दंड या दुष्ट चक्रामध्ये चक्रवाढ व्याजापेक्षाही जास्त पैसे कर्जदाराला भरावे लागतात.
10 हजारचा मोबार्इल घेतल्यानंतर त्या मोबार्इलचे कोरोनामुळे हप्ते थकित झाले. एका बाजूला मुलांचे शिक्षण ऑनलार्इन ठेवण्यासाठी मोबार्इल गरजेचे होते. अशावेळी बजाज फायनान्ससारख्या कंपन्यांकडून ग्राहकांनी मोबार्इल घेतले. जेव्हा कोरोनामुळे उत्पन्न थांबले त्यावेळी फायनान्स कंपन्यांनी 450 ते 1500 रुपये दंड एका हप्त्याला लावला. ही कहाणी इथेच संपत नाही. ज्या बँकेचे चेक आपण इसीएस सिस्टीमसाठी देतो ती इसीएस या फायनान्स कंपन्या 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत 5 ते 6 वेळा टाकतात. या प्रत्येक वेळी बँक 570 रुपये प्रमाणे सहावेळा चार्ज कट करते व हा चार्ज भरला नाही तर खाते ब्लॉक करते. म्हणजे 2000 रु.च्या हप्त्यासाठी बँका व फायनान्स कंपन्या यांच्या या फसवेगीरीच्या प्रणालीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना हा 10 हजारचा मोबार्इल 40 हजारला पडतो. पण माहिती नसल्याने हा दंड बँकेने लावला आहे हे काहींच्या लक्षातच येत नाही. या फायनान्स कंपन्या किंवा क्रेडिट कार्डच्या कंपन्या कर्जतर आकर्षक जाहिरातीवर देतात, मात्र नियमबाह्य सकाळी 6 वाजल्यापासूनच कर्जदारांच्या दारात वसूलीसाठी जातात. कर्जदार नसेल तर त्याच्या कुटुंबियांना धमकावून किंवा अपमानास्पद वागणूक देवून तुमची लायकी नव्हती तर तुम्ही कर्ज घेतलात कशाला, असा पाणउतारा करुन 10 हजारच्या मोबार्इलसाठी अब्रुचा पंचनामा करतात. यासाठी स्थानिक ज्यांना 6 हजार देखील पगार नसतो अशीच मुले
अज्ञानाचा फायदा घेवून कर्जदाराला वेगवेगळ्या पद्धतीने वसूलीचा तगादा लावतात. कारण याच वसूलीमधून त्यांना कमिशन मिळते व वसूली झाली नाही तर त्यांना पगारही दिला जात नाही. त्यामुळे 10 हजारच्या 0 टक्के व्याजाची भिक नको पण हे वसुलीचे कुत्रे
आवरा! अशी म्हणण्याची वेळ कर्जदारावर आली आहे.
सोनेतारण कर्ज घेतल्यास त्याला लेखी नोटीस न देता ग्राहकांचे सोने परस्पर लिलाव केले जाते. अवास्तव चार्जेस व दंड आकारला जातो. आयएफएल किंवा मुथुट अशा खाजगी कंपनीमध्ये कर्ज न काढता शासकीय बँकेमध्ये सोनेतारण कर्ज घेतल्यास ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे.
बजाज फायनान्स व प्रायव्हेट फायनान्स यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीत लोन घेण्याचे टाळावे. वेगवेगळ्या ऑफरला बळी पडून आपली किती फसगत झाली, हे तुम्हाला स्टेटमेंटवरुन कळेल. तुम्ही निवडून दिलेले राजकीय लोक कोरोनाच्या कालावधीत बँकांनी लावलेला दंड व मिनिमम बॅलन्स चार्जेस यासाठी राज्यव्यापी चळवळ होणे गरजेचे आहे.
आरबीआय व भारत सरकार यांच्या गार्इडलार्इननुसार कर्ज वसुली होणे आवश्यक आहे. कर्जदारांची परिस्थिती ही कोरोनामुळे निर्माण झाली आहे. मिनिमम बॅलन्स चार्जेसच्या नावाखाली करोडो रुपये लॉकडाऊनमध्ये सुद्धा बँकांनी कमवले आहेत. कर्जहप्ते, दंड, या सर्वांवरती आपले मौन सोडून राज्यव्यापी तक्रारी बँकोकडे करणे व ग्राहकमंचामध्ये किंवा अपमानास्पद वागणूक दिल्यास पोलीस स्टेशनला रितसर एफआयआर दाखल करावा. तरीही बँकांकडून नियमानुसार कोर्टाकडून वसूली व्हावी. कोणत्याही पोलिसांनी जप्तीसाठी कोर्टाच्या परवानगीशिवाय शिक्के देवू नयेत, असे स्पष्ट आदेश होण्यासाठी गृहमंत्रालयाकडे कार्यकर्त्यांनी जोर लावला पाहिजे. मदतीसाठी संपर्क पूर्वा किणे # सेवा 9422050977.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा