रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव दिनांक २० व २२ ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांची भूमिपुजने करण्यासाठी गुहागर दौ-यावर जाणार आहेत. बुधवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११:३० वा. वडद येथे विकास कामांचे भूमिपुजन व बैठक, दुपारी १२ ते १.३० वा. पेवे येथे विकास कामांचे भूमिपुजन व बैठक, दुपारी २ ते ३ वा. निगुंडळ येथे विकास कामांचे भूमिपुजन व बैठक, दुपारी ३ वा.प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा, दुपारी ३:१५ ते ४.३० वा. पालपेणे आणि सायंकाळी ४.४५ ते ६.०० वा. खामशेत येथे विकास कामांचे भूमिपुजने असा कार्यक्रम आहे. तसेच शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वा. त्रिशुळ येथे, दुपारी ११.३० ते १.३० वा.पवार साखरी येथे, दुपारी १.३० ते ३.०० वा.धोपावे, सायंकाळी ४.३० ते ५.३० वा.आरे येथे, सायंकाळी ६.०० ते ७.०० वरवेली येथे विविध विकास कामांची भूमिपुजने व बैठका असा कार्यक्रम आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा