
इंधनसंकट गंभीर; कोळसा तुटवड्याने वीजनिर्मितीचे आव्हान
पेट्रोल-डिझेल दरांत पुन्हा वाढ; कोळसा तुटवड्याने वीजनिर्मितीचे आव्हान
देशात आठवड्याभरात पेट्रोल दरात मंगळवारी सहाव्यांदा वाढ नोंदविण्यात आली. इंधनदर नियंत्रणाचे आव्हान कायम असताना देशातील कोळशावर आधारित वीज केंद्रांकडे सरासरी केवळ चार दिवसांचा कोळसा साठा उरल्याने वीजनिर्मितीचेही नवे संकट उभे ठाकले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने देशात इंधनदरवाढीचा भडका उडाला आहे. आठवड्याभरात सहाव्यांदा दरवाढीमुळे देशातील बहुतांश मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. डिझेलदरात दोन आठवड्यांत नऊवेळा वाढ झाली आहे. याआधी मे व जुलै महिन्यात अनेकदा दरवाढ करण्यात आली होती. ४ मे ते १७ जुलै या काळात पेट्रोलच्या किमती ११ रुपये ४४ पैशांनी वाढल्या तर डिझेलच्या किमती ९ रुपये १४ पैशांनी वाढल्या होत्या. काही वेळा इंधनाच्या किमती स्थिर होत्या. फार थोड्या वेळा इंधन दर कमी झाल्याचे दिसून येते.
१८ जुलै ते २३ सप्टेंबर या काळात दरवाढ करण्यात आली नव्हती. उलट पेट्रोलच्या किमती लिटरला ६५ पैशांनी तर डिझेलच्या सव्वा रुपयाने कमी झाल्या होत्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात २४ व २८ तारखेला किमती वाढल्या होत्या. त्यात पेट्रोलचे दर दीड रुपयांनी वाढले होते.
पावसामुळे कोळसापेच..
देशात कोळशाचा पुरवठा अपुरा झाल्याने ऊर्जा पेचप्रसंग निर्माण झाला असून जगातील वेगाने वाढणाऱ्या भारतासारख्या अर्थव्यवस्थेला ही परिस्थिती धोक्यात आणणारी आहे. कोळशाचा सत्तर टक्के वापर वीजनिर्मितीसाठी केला जात असून विजेचे दरही वाढत चालले आहेत. यावर उपाय म्हणून अॅल्युमिनियम स्मेल्टर्स व पोलाद कारखान्यांचा कोळसापुरवठा वीजनिर्मितीकडे काही प्रमाणात वळवण्यात येत आहे. चीनप्रमाणेच भारतापुढे दोन प्रश्न असून एकतर विजेची मागणी वाढत असून करोनाकाळानंतर औद्योगिक कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. देशात तीन चतुर्थांश ऊर्जा कोळशाची गरज देशी पातळीवर भागवली जाते. पुरामुळे अनेक खाणीत पाणी गेले आहे. काही वाहतूक मार्गात अडथळे आले आहेत. देशी कंपन्यांपुढे वेगळा पेच निर्माण झाला असून त्यांना स्थानिक कोळसा पुरवठ्यासाठी लिलावात जास्त प्रीमियम द्यावे लागत आहे. सागरी कोळशाच्या बाजारपेठेतील किमतीही वाढल्या आहेत. सरकार बंद पडलेली वीजकेंद्रे पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत झाल्याशिवाय विजेची स्थिती सुधारणार नाही शिवाय ग्राहकांना विजेसाठी जास्त पैसे मोजावे लागतील असे क्रिसिल लि. चे पायाभूत सुविधा संचालक प्रणव मास्टर यांनी म्हटले आहे. पाऊस थांबल्यानंतर परिस्थिती सुरळीत होण्याची आशा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय वीज प्रकल्पातील कोळसा साठा सप्टेंबरअखेरीस ८१ लाख टनांपर्यंत खाली आला होता. तो गेल्या वर्षी पेक्षा ७६ टक्के कमी होता. इंडियन एनर्जी एक्स्चेंज लि. च्या मते सप्टेंबरमध्ये विजेचे दर ६३ टक्के वाढले ते सप्टेंबरमध्ये ४.४ रुपये किलोवॅट (तासानुसार) होते. दरम्यान अॅल्युमिनियमसह काही उद्योगांचा कोळसापुरवठा कोल इंडिया लि.ने कमी केल्यानंतर या उद्योगाने तक्रारीचा सूर आळवला होता.
नवे दर…
दिल्लीत मंगळवारी पेट्रोल दरात
२५ पैशांनी वाढ झाली. तिथे पेट्रोल १०२ रुपये ६४ पैसे झाले आहे. डिझेल ३० पैशांनी महाग झाले असून ते आता ९१ रुपये ७ पैसे आहे. मुंबईत पेट्रोलदर १०८ रुपये ६७ पैसे, तर डिझेल दर ९८ रुपये ८० पैसे असल्याचे इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
कोळसास्थिती…
सध्या गरजेच्या किमान निम्मी वीजकेंद्रे वीजपुरवठा करू शकणार नाहीत, अशी कोळसा पुरवठ्याची स्थिती आहे. आयात कोळशाचे दरही वाढत असून, देशी कोळशावर चालणारी वीजकेंद्रे अडचणीत आली आहेत.
कारण काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने सात वर्षांतील उच्चांक गाठला आहे. ब्रेन्टच्या किमती पिंपाला ८१.५१ डॉलरवर पोहोचल्या आहेत. वेस्ट टेक्सासच्या तेल किमती पिंपाला ७७.७६ डॉलर झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीमुळे भारतात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
‘शंभर’ मोजणारी राज्ये…
आठवड्यात लागोपाठ सहाव्यांदा दरवाढ झाल्याने देशात बहुतांश ठिकाणी पेट्रोल शंभरीवर गेले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांसह अन्य राज्यांच्या मोठ्या शहरांत पेट्रोलसाठी लिटरमागे १०० रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागत आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा