पेट्रोल - डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात रत्नागिरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार...
रा.काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष श्री मेहबूब शेख यांच्या आदेशानुसार राज्यभर २० ऑक्टोबरला युवक करणार आंदोलन...
रत्नागिरी प्रतिनीधी
देशातील पेट्रोल- डिझेल आणि गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभरात दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशानुसार करण्यात येणार आहे अशी माहिती रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष श्री सिध्देश शिवलकर यांनी रत्नागिरी न्युजशी दिली.
सदर हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य जेष्ठ नेते श्री बशीरभाई मुर्तुझा, पक्षप्रतोद जेष्ठ नेते श्री सुदेश मयेकर, जेष्ठ नेते श्री राजाभाऊ लिमये, तालुकाध्यक्ष श्री राजन दादा सुर्वे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष श्री झुबेरभाई काझी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात येणार आहे.
'अबकी बार महेंगाई पर वार' असं म्हणत युवक तालुकाध्यक्ष श्री सिध्देश शिवलकर यांनी रणशिंग फुकारून रत्नागिरी तालुक्यातील युवकांना हाक दिली असून जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा! असे आवाहनही युवक तालुकाध्यक्ष श्री सिध्देश शिवलकर यांनी केले आहे.
तसेच युवक तालुका उपाध्यक्ष श्री निलेश खोराटे, श्री सुकेश शिवलकर, श्री वैभव नैकर, श्री मुज्जफर काझी, श्री प्रितम भाटकर, युवा शहर नेते श्री नौसीन भाई काझी यांनी सुध्दा या आंदोलनात युवकांनी मोठया संख्खेने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा