Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

चीनच्या कुरूबुरी अजून सुरूच; पुन्हा संघर्षाची शक्यता


India china 13th round military level border talks Chinese side wasnt agreeable

 चीनच्या कुरूबुरी अजून सुरूच; पुन्हा संघर्षाची शक्यता


पूर्व लडाखमधील माघारीबाबत भारताच्या मागण्या अवास्तव असल्याची चीनची भूमिका

भारत आणि चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाखमधील उर्वरित भागातील सैन्य माघारीबाबत लष्करी पातळीवरील उच्चस्तरीय चर्चेची तेरावी फेरी रविवारी पार पडली. यावेळी भारतीय लष्कराने चीनची बाजू सहमत नसल्याचे म्हणत कोणताही दूरगामी प्रस्ताव देऊ शकत नाही असे म्हटले आहे. दरम्यान, चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने पीएलए वेस्टर्न थिएटर कमांडच्या हवाल्याने म्हटले आहे की या काळात भारताने अवास्तव मागण्यांवर जोर दिला होता. भारताने चर्चेत अडचणी निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

“बैठकीदरम्यान, भारताच्या उर्वरित क्षेत्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या पण चीनने यावर सहमती दर्शवली नाही. तसेच चीन कोणताही दूरगामी प्रस्ताव देखील देऊ शकला नाही. त्यामुळे बैठकीत उर्वरित भागांवर योग्य चर्चा होऊ शकली नाही,” असे सैन्याच्या एका निवेदनात म्हटले आहे. तर दोन्ही बाजूंनी संवाद राखण्यासाठी आणि जमिनीवर स्थिरता राखण्यासाठी देखील सहमती दर्शविली आहे असे यात म्हटले आहे.

“चीन द्विपक्षीय संबंधांचा एकंदर दृष्टीकोन विचारात घेईल आणि द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करून उर्वरित समस्यांचे लवकर निराकरण करण्याच्या दिशेने काम करेल अशी आमची अपेक्षा आहे,” असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

मात्र चीनच्या ग्लोबल टाइम्सने सोमवारी सकाळी एका ट्विटमध्ये पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या हवाल्याने भारत अवास्तव मागण्यांद्वारे चर्चेत अडचणी निर्माण करत आहे, असे म्हटले आहे. “चीन आणि भारत यांच्यातील कॉर्पस कमांडर स्तरावरील चर्चेची तेरावी फेरी रविवारी झाली. भारत अवास्तव मागण्यांसाठी दबाव टाकत आहे, ज्यामुळे वाटाघाटी करणे कठीण झाले आहे,” असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

चर्चेची तेरावी फेरी ही कोअर कमांडर पातळीवर मोल्दो या चीनकडच्या बाजूला सुरू झाली होती. सकाळी दहा वाजता चर्चेला सुरुवात झाली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चीनचे समपदस्थ वँग यी यांना लडाखच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली.

दरम्यान, बाराव्या फेरीच्या चर्चेनंतर चीनने गोग्रा येथून माघार घेतली होती. चीनने उत्तराखंडमधील बाराहोटी व अरुणाचलातील तवांग क्षेत्रात केलेल्या घुसखोरीच्या पाश्र्वाभूमीवर आताची चर्चा होत आहे. तवांग येथे दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. नंतर कमांडर पातळीवरील चर्चेत हा वाद मिटवण्यात आला होता. सैन्य माघारीची प्रक्रिया वेगाने घडून यावी अशी भारताची अपेक्षा असून देपसांग व डेमचोक  येथून चीनने सैन्य माघारी घ्यावे यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. ३१ जुलै रोजी चर्चेच्या बाराव्या फेरीत गोग्रा  येथून सैन्य माघारीच्या मुद्द्यावर यश आले होते. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही माघार महत्त्वाची होती.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment