राणे कुटुंब आणि डीएचएफएल यांच्यातील व्यवहार पुर्ण झाल्यामुळे पोलिसांकडुन लुकआउट सर्क्युलर रद्द
डीएचएफएल' कर्ज प्रकर णी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले होतेनीलम राणे आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने कर्ज घेतलं होते. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, हे सर्क्युलर रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत.
नीलम राणे आर्टलाइन प्रॉपर्टीज कंपनीने डीएचएफएलकडून सुमारे ४० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे या कर्जासाठी करण्यात आलेल्या अर्जात सहअर्जदार होते. त्याची ३४ कोटीपर्यंत थकबाकी होती. डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी लुक आउट सर्क्युलर जारी केलं होतं. दरम्यान, राणे कुटुंब आणि डीएचएफएल यांच्यातील व्यवहार पुर्ण झाल्यामुळे पोलिसांनी सर्क्युलर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती क्राईम पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा