
रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जाहीर झालेल्या या बोनसचा सुमारे ११.५६ लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना लाभ होईल
देशातील पात्र अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्यापूर्वी बोनस जाहीर केला जातो. पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची कमाल रक्कम ७८ दिवसांसाठी १७९५१ रुपये आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जाहीर झालेल्या या बोनसचा सुमारे ११.५६ लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना लाभ होईल, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे १९८५ कोटी रुपयांचा बोजा पडेल.
बोनस नेहमीप्रमाणे दसऱ्यापूर्वी वितरित केला जाईल, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा