Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोविडमध्ये विशेष रेल्वेगाड्या चालवून रेल्वे प्रवाशांची किती लूट करणार? काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा सवाल




 कोविडमध्ये विशेष रेल्वेगाड्या चालवून  रेल्वे प्रवाशांची किती लूट करणार? काँग्रेसचे खासदार  बाळू धानोरकर यांचा सवाल  

रेल्वे मंत्रालयाने कोविडमध्ये विशेष रेल्वेगाड्या सरू केल्या. त्यांचे नियमित रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक भाडे आकारले जात आहे. आता करोना कमी झाला असला तरी विशेष गाड्या चालवून रेल्वेने सामान्य प्रवाशांची लूट सुरूच ठेवली आहे. ही लूट केव्हापर्यंत चालणार, असा सवाल काँग्रेसचे खासदार  बाळू धानोरकर यांनी रेल्वेमंत्र्यांना केला आहे.

केंद्र सरकारने टाळेबंदी शिथिल झाल्याने रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली. परंतु रेल्वेने प्रारंभी कोविड स्पेशल आणि नंतर विशेषगाड्या सुरू केल्यात. टाळेबंदीआधी ज्या रेल्वे धावत होत्या, त्यांच्या वेळवर अनेक विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोकर यांना केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारला सर्वसामान्यांशी काही देणघेणे नाही. लोकांवर आर्थिक भुर्दंड लावून त्यांची अवहेलना करणे आणि मूठभर लोकांसाठी सरकार चालवणे हे एकमेव धोरण केंद्रातील भाजप सरकारचे आहे, असा गंभीर आरोपही त्यांना केला. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कोविडच्या नावाखाली वाढलेले रेल्वेचे तिकीट दर कमी करण्यात यावेत. नियमित रेल्वे सुरू करण्यात याव्या आणि ज्येष्ठ नागरिक, अपंग, कर्करोग रुग्णांच्या प्रवासभाड्यातील सवलती तातडीने पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा