ग्रामपंचायत कोतवडे तर्फे दिव्यांग मार्गदर्शन शिबिर सम्पन्न
रत्नागिरी
सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रामपंचायत कोतवडे च्या सभागृहात रत्नागिरी हॅनंडीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशन, रत्नागिरी व ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे यांच्या संयुक्त विद्यमाने कोतवडे गावातील दिव्यांग व्यक्तींसाठी माहिती व मार्गदर्शन शिबिर सम्पन्न झाले. सरपंच तुफील पटेल यांनी प्रथम उपस्थितांचे स्वागत केले. तद्नंतर रत्नागिरी हॅनंडीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशन, रत्नागिरी चे अध्यक्ष श्री सादिक नाकाड़े यांनी संस्थेच्या कार्याबद्दलची माहिती दिली यावेळी त्यांनी स्वानुभव ही कथन केले. संस्थेचे आजीव सभासद श्री समीर नाकाड़े यांनी दिव्यांगांसाठी शासना कडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्या मद्धे युनिक कार्ड, मतिमंद व्यक्तींचे पालकत्व, 80% पेक्षा जास्त अपंगांना जिल्हा परिषद मधून मिळणारा अतितीव्र निधी, दिव्यांग पेन्शन योजना, लग्नांन्तर मिळणारे 50,000/- अनुदान , एस टी, रेल्वे, विमान प्रवासा मद्धे मिळणारी सवलत, दिव्यांग बचत गट, ग्रामपंचायत /पंचायत समिती/जिल्हापरिषद/आमदार/ खासदार यांच्या कडून मिळणारे सानुग्रह अनुदान, दिव्यांगांसाठी मिळणारे बँकेचे कर्ज अश्या विवीध योजनांची उपयुक्त माहिती संस्थे कडून देण्यात आली.
या योजनांचा जास्तीत जास्त लाभ आपल्या कोतवडे गावातील दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन सरपंचांनी यावेळी केले.
महा-ई- सेवा केंद्रा मधून दिव्यांगांसाठी ऑनलाईन चे काम प्राधान्याने केले जाईल असे यावेळी श्री उमेश लाड यांनी विषद केले.
सर्व उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांन चे आभार ग्रामपंचायत सदस्या सौ दिया कांबळे यांनी मानले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा