Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोल्हापूर : महालक्ष्मीच्या मुख्य दर्शनाच्या लाभासाठी आता ताशी हजार भक्तांचे नियोजन

 


कोल्हापूर : महालक्ष्मीच्या मुख्य दर्शनाच्या लाभासाठी आता ताशी हजार भक्तांचे नियोजन


नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची माहेश्वरी मातृका रूपात पूजा बांधण्यात आली होती.

करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मुख्य दर्शनाचा लाभ दर तासाला १ हजार भाविकांना घेता यावा असे नियोजन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी प्रायोगिक तत्त्वावर तासाला ९०० भक्तांना मुख्य दर्शनासाठी पाठवण्यात आले. मुख्य दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असून समितीकडून चोख व्यवस्थापन केले जात आहे.

मुख्य दर्शनाच्या भक्तांची संख्या आणि वाचणारा वेळ लक्षात घेता देवस्थान समितीने मंदिरात भक्तांना सोडण्याची वेळ वाढवली आहे. शनिवार पासून दर तासाला १ हजार आणि पुढे शक्य झाले तर आणखी जास्त भक्तांना मंदिरात सोडण्याचे नियोजन आहे. कदाचित प्रतिदिनी १५ हजार भक्तांना दर्शनलाभ होवू शकतो. दरम्यान,१० ते १२ तारखे पर्यंतच्या ऑनलाईन बुकिंग शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी १४ हजार भाविकांनी देवीचे मुख्य दर्शन घेतले, अशी माहिती समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

माहेश्वरी मातृका रूपात पूजा –

नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीची माहेश्वरी मातृका रूपात पूजा बांधण्यात आली. द्वितीय मातृका माहेश्वरी हे भगवान शंकराची शक्ती आहे. ती नंदीवर आरूढ नसून चार हात व त्रिनेत्र आहेत. हातात त्रिशूळ, डमरू, माळा, वाडगा आहे. ही पूजा अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी मांडली.

असभ्यतेवर टीका –

परिवहनमंत्री अनिल परब, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पत्नी प्राची जावडेकर यांनी ऑनलाईन बुकिंग करून आज दर्शन घेतले. दरम्यान, मंदिरात काही अतिप्रमुख (व्हीआयपी) आले असता दरवाजासमोरच पादत्राणे काढल्याची छायाचित्रे दिवसभर सगळीकडे अग्रेषित या असभ्य वर्तनावर भक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment