
बनावट खातेधारकांकडून शेतकऱ्यांच्या भरपाईवर डल्ला
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तालुक्यातील तीन गावांमध्ये एक हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे काम सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नावाची भरपाई बनावट खातेधारक लाटत असल्याचे उजेडात आले आहे.
एमआयडीसीने चिंध्रण, कानपोली आणि म्हाळुंगी या गावांच्या परिसरातील १ हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले. आहे. संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडून मिळणारी भरपाई अपुरी असून त्यामध्ये वाढ मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. या अर्जाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या नावाची नुकसानभरपाई बनावट खातेधारक लाटत असल्याचे उजेडात आले आहे. सध्या विष्णू कडू या जागरूक शेतकऱ्यामुळे हा गैरउद्योग उजेडात आला आहे. कडू यांना मिळणारे ३ कोटी ४६ लाख रुपये ठकविण्यासाठी एक टोळी सक्रिय असल्याचे उजेडात आले.
कडू यांची शेतजमीन सव्र्हे क्र. ४७,३ व ४ हे क्षेत्र ७७ गुंठे असून त्यांच्या एकटय़ाच्या नावाने आहे. नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये कडू यांचे हे क्षेत्र संपादित झाले आहे. चिंध्रण गावकऱ्यांनी त्यांना नुकसानभरपाईत वाढ मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. कडू यांच्याप्रमाणे शेकडो शेतकरी सरकारी भाववाढ कधी मिळेल याकडे लक्ष देऊन आहेत. मात्र या भाववाढीच्या प्रतीक्षेत असताना कडू यांच्या मित्राने त्यांना गेल्या आठवडय़ात तुमच्या जमिनीची भरपाई स्वीकारण्यासाठी एक व्यक्ती पनवेलच्या प्रांत कार्यालयात आल्याची माहिती दिली. या प्रकाराची खात्री करण्यासाठी कडू यांनी प्रांत कार्यालयात धाव घेतली. तिथे कडू यांच्या भरपाईसंदर्भात प्रकरण बनवून प्रांत अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती कडू यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
सावध झालेल्या कडू यांच्यासह चिंध्रण गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे खातेधारक बदलले तर नाहीत ना, यासाठी प्रांत कार्यालयात खात्रीसाठी शोधाशोध सुरू केली आहे. या सर्व प्रकरणात ज्या जमिनीच्या सातबारावर एकाच शेतकऱ्याचे नाव आहे अशांनाच टोळीकडून लक्ष्य केले जात असल्याच्या चर्चेने शेतकरी धास्तावले आहेत. जून महिन्यापासून विष्णू कडू यांच्या राहत्या घरच्या पत्त्यावर विविध ओळखपत्रे पोस्टाने पाठविण्यात येत होती. मात्र कडू यांनी कुठेच अर्ज न केल्याने ही त्यांची ओळखपत्रे नसल्याचे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर अनेक ओळखपत्रे स्वीकारली नाहीत.
या सर्व प्रकारानंतर कडू यांनी वकिलामार्फत विद्यमान प्रांतअधिकारी राहुल मुंडके यांना नुकसानभरपाई चुकीच्या व्यक्तीला देऊ नये यासाठी हरकतीचा अर्ज दिला आहे. तसेच संबंधित अर्जावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. कडू यांना प्रांतधिकारी मुंडके यांनी सर्व कारभार कागदपत्रे तपासून पारदर्शक पद्धतीने होईल, असे आश्वासन देत भरपाई चुकीच्या हातांमध्ये कदापि जाणार नसल्याचे आश्वासन दिले.
पनवेलच्या शेतकऱ्यांना जागरूक राहण्याची गरज आहे. विशेषकरून ज्या शेतजमिनीचे भूसंपादन होत आहे अशा गावांमध्ये अधिक जागरूकता असणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मदत होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. प्रशासन अशा लबाडांसोबत असल्याने अशा घटना घडतात. शेतकऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. स्वत:ची नुकसानभरपाई इतरांना मिळू नये यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून प्रांत कार्यालयात जाऊन संपादनात नेमके कोण लाभार्थी होण्यासाठी पाठपुरावा करतोय काय याकडे लक्ष द्यावे.
– काशिनाथ पाटील, सदस्य, पनवेल पंचायत समिती
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा