काव्यपुष्प
---------------------
एकदाची शाळा भरू दे.
एकदाची शाळा भरू दे
गोंगाट कानी पडू दे !!
फळ्यावर काहीतरी लिहू,
समजेपर्यंत समजून देऊ.
हातात खडू घेऊ दे,
मुलांना जरा ओरडू दे.
एकदाची शाळा भरू दे,
गोंगाट कानी पडू दे !!
मुलांच्या भावना जाणू,
अभ्यासाकडे परत आणू.
सोबत मुलांच्या खेळू दे,
मैदानात धावपळ होऊ दे.
एकदाची शाळा भरू दे,
गोंगाट कानी पडू दे !!
साधूया मुलांशी संवाद ,
पाहू त्यांचा प्रतिसाद.
घंटेचे टोल घणघणुदे,
तासांची लगबग सुरू होऊदे II
एकदाची शाळा भरू दे
गोंगाट कानी पडू दे !!
तोंडी-लेखी प्रात्यक्षिक घेऊ,
योग्यतेनुसार श्रेणीत ठेऊ.
निरागसते मध्ये रमू दे,
नैराश्य, दुःख दूर होऊदे.
एकदाची शाळा भरू दे,
गोंगाट कानी पडू दे.
एकदाची शाळा भरू दे,
गोंगाट कानी पडू दे.
यो. ग.शेट्ये ...
-------------------------
आजची चारोळी
समजून घ्यायचं म्हणलं तर
तसं खूप सोपं असतं,
घ्यायचच नसेल तर मात्र
सगळच अवघड असतं .
सौ. हेमा जाधव, सातारा
---------------------------------
साम्यर्थ शब्दांचे...
शब्दांचाच खेळ सारा
फुलतो शब्दांचाच मेळ
कधी वार, बनून तर
कधी शब्दांचाच बनून खेळ
किती मोठा शब्दात
लपलेला आहे साम्यर्थ
शब्दांनीच शाधता येते
अध्यात्मिक परमार्थ
शबदावाचून अर्थ नाही
पण गोडवा वाणीत हवा
जिभेवर साखर ठेऊन
माणूस जोडता यावा नवा
शब्दांचा बाण लागते
शब्दांनीच आसरा मिळते
शब्दांनीच प्रेम फुलतो
शब्दच बदनाम करते
शब्दांनीच आट पाट येते
शब्दानेच संकटातून सावरतो
शब्द एक संजीवनी आहे
ते जीवन भर पुरून उरतो
संगिता वाल्मीक रामटेके गडचिरोली
मो.९४२३६०४१४०
----------------------------------------
हे कोरोना बाप..
हे कोरोना बापा.....
आता तरी शाळा
आमची सुरू होऊ दे....
थोडी दंगा मस्ती lकरू दे..
हे कोरोना बापा...
विद्यार्थ्यांचा गोंगाट
कानी आमच्या पडू दे...
नवा नवा पाठ आम्हास शिकू दे...
हे कॉरोणा बापा...
आता तू आरपार निघून जा
विसरलेला आभ्यास शिकू दे
अ, आ ,इ, ई पाठीवर उरतवू दे
हे कोरोना खुप कहर केला
जाना रे बाबा ,माघारी आता
तुला जाण्यासाठी सांग रे
उपाय करू मी कोणता
संगिता रामटेके गडचिरोली
--------------------------------------
तेरी निशानियाँ होगी..
बिना तेरे ये ज़िंदगी कैसी होगी।
सुबह तो ठीक शाम कैसी होगी।
मन आलसी दिल ख़ामोश और
धड़कने हमसे नाराज़ होगी।
ख्यालों में बीमारी होगी शुरुआत
चाय की जगह कॉफी से होगी।
चेहरें पर ग़म की लाली और
ज़ुबान पर तेरे की आवारगी होगी।
नज़र हमारी हर वक़्त खिड़की
पर दस्तक देती बेड़ियोँ पर होगी।
मेरी कविताओ में शब्दों क़े उपर
बिंदिया सी तेरी निशानियाँ होगी।
चलो तुम्हारे लिए तो सही लेक़िन
मेरे लिए तो हर दिन सज़ा होगी।
तुझे चाहतें रहना हमारी आदत
तेरी परछाई हमारी पहचान होगी।
नीक राजपूत
9898693535
---------------------------
भरणार माझी शाळा
वर्गाचा...खुलणार टाळा
भरणार...माझी शाळा
मुले... होणार गोळा
फळा.....बोलणार काळा१
पुन्हा.....वाजणार घंटा
मुलांचा....लागणार तंटा
कविता.... येणार कंठा
कोड्यांचा...होणार फंटा२
सारे....टाळू गर्दी
दूर......ठेऊ सर्दी
रोज....घालू वर्दी
अभ्यासास...होऊ दर्दी३
रोज...शाळेत येऊया
गंमत...छान करूया
अभ्यास...गती वाढवूया
मळा...शाळेचा फुलवूया४
अंतर....सुरक्षित ठेऊया
तोंडाला..."मास्क"लावूया
संसर्ग ...अवश्य टाळूया
कोरोना....नियम पाळूया५
श्री.कृष्णा दामोदर शिंदे.
इंदापुर पुणे
-----------------------------
लालबहादूर शास्त्री !
लालबहादूर शास्त्री
वाराणसीत शिकले
अनवाणी मैलोमैल
पाय त्यांचे हो शेकले!१
वय सोळाव्या वर्षीच
देशभक्तीचा प्रभाव
गांधीजी असहकार
चेतवला त्यांनी गाव!२
काशी विद्यापीठात ते
ब्रिटीशाविरूध्द आले
पदवी विद्यापिठाची
"शास्त्री" हे नाव मिळाले!३
लोण्यासम बाहेरून
कणखर ते आतून
निश्चयाचे ठाम होते
निर्णय ते पारखून!४
नम्र,दृढ दूरदर्शी
विकासाच्या मार्गावर
तीस वर्षे सेवा केली
भारताच्या स्वर्गावर!५
*कवीवर्य तथा शीघ्रकवी
श्री.कृष्णा दामोदर शिंदे.
--------------------------------
गांधीजी!
स्वातंत्र्य शिल्पकार
मोहनदास करमचंद गांधी
अहिंसेची नांदी
*बापूजी!१
उपोषणे सत्याग्रहे
न्याय हक्कासाठी केले
आयुष्य वेचिले
गांधीजींनी !२
असहकार स्वदेशी
चला खेड्याकडे नारा
मवाळतेचा वारा
*मोहन!३
राष्ट्रपिता महात्मा
म्हणती आदरे त्यांना
साद बापूजींना
बालकांची!४
आज जयंतीदिनी
त्यांना वंदन माझे
शांतीचे ओझे
वाढविण्या!५
*कृष्णा दामोदर शिंदे.
--------------------------------
बहार
निसर्ग मित्र
घरीदारी सर्वत्र
आरोग्य सुत्र
हिरवीगार
वनराई वाढता
बहारदार
नव्या युगाची
संजीवनी निसर्ग
साक्ष मनाची
सौ उषा राऊत
----------------------------------
विषय - आभाळ फाटल
शीर्षक - ठप्प सर्व कारभार
आभाळ फाटल सुटे पावसाची धार
ह्रदय फाटल तुटे ह्रदयाची तार..........
जिकडे तिकडे पावसामुळे महापूर
दुःखमय सुटे सर्वजना हाहाकार..........
तुडुंब भरले नदी नाले सारीकडे
क्षणातच सुटे निसर्गाचा चमत्कार..........
कुणाच्या घरात पाणी कुणाचे घर वाहिले
अन्नाविना सर्वांची होई उपासमार..........
कोठे वाहने तर कोठे माणसे गेली
सुटे दुःखी सुनामी लाटेचा भडीमार..........
नदी मातेने आक्राळ विक्राळ रूप धारीले
तरीपण पाऊस चालूच ठप्प झाला कारभार..........
देविदास हरीदास वंजारे ता.किनवट जि.नांदेड
----------------------
इतिहास
सारे सारे निघून गेलेत
"कहीं दूर, कहीं दूर"
लता, आशा आता गात नाहीत
भीमसेन, कुमारचे सुर हरवले
शिवकुमार, हरिप्रसाद ही आता केव्हातरी
आर डी, लक्ष्मी-प्यारे शांत झालेत
कपिल, गावस्कर, तेंडुलकर आता खेळत नाहीत
प्राण, कादर खानची दादागिरी संपलिये
अमिताभ आता फाइटिंग करत नाही
रेखा, हेमा, जीनत, परवीन
सा-यांचं सौंदर्य संपुन गेलय
अटलजींचं ओघवतं हिंदी,
इन्दीवरच्या गाजलेल्या मैफिली
जगजीत, मेहन्दीचा दर्दभरा आवाज
रफी, किशोरची हृदयातली साद
मुकेशचं कारुण्यं, मन्ना डेचा पहाड़ी सुर
सारे सारे निघून गेलेत
"कहीं दूर, कहीं दूर"
रेश्माची तानही विरून गेलीये
तलतची मखमल विरून गेलीये
पु.लंचं मिश्किलपणे गोष्टी सांगणं
बापट, विंदा, पाडगावकरांचं कविता ऐकवणं
हृदयनाथ, ग्रेसच्या अविस्मरणीय मैफिली
पल्लेदार संवादांनी जीवंत झालेला
काशीनाथ घाणेकरांचा संभाजी
कड़क, शिस्तप्रिय तरीही प्रेमळ, हवासा
सतिष दुभाषींचा प्राध्यापक
आणि भक्ति बर्वेंची "ती फूलराणी"
नंदू भेंडेने जीवंत केलेला
पु.लंचा "तीन पैशाचा तमाशा"
डॉ. आगाशेंचा "घाशीराम कोतवाल"
विजयाबाईंचं "हयवदन"
"हमिदाबाई", "बारिस्टर"
जब्बारची "अशी पाखरे येती"
आणि "सिंहासन"
सिंहासनमधली लागु, भटांची जुगलबंदी
सामनामधली लागु, फुलेंची आतिशबाजी
"पुरुष" मधला रासवट नाना
"चिमणराव" प्रभावळकर
आणि "गुंड्याभाउ" कर्वे
"गज-या"तले आपटे
"प्रतिभा आणि _प्रतिमा"ची सुहासिनी मुळगावकर_*
आकाशानंदांचा "ज्ञानदीप"
तबस्सुमचं "गुलशन गुलशन"
आवाज़ की दुनिया का दोस्त
अमीन सायानिचा दर बुधवारचा
आज पहली पायदान पर हैं
म्हणत हृदयाला हात घालणारा आवाज
रविवारचा विविधभारतीवरचा
"एस. कुमार का फिल्मी मुक़दमा"
आणि रेडियो सीलोन वरचा
सैगल चा समारोप स्वर
दर एक तारखेला नं चुकता लागणारं
किशोरचं "दिन हैं सुहाना आज पहली तारीख हैं"
म्हणून आठवण करून देणं
तल्यारखान, लाला अमरनाथचा
कानात प्राण आणून
ऐकलेला क्रिकेटचा "आँखों देखा हाल"
आणि black and white मधे
बघितलेली 1980 ची
बोर्ग आणि मकेन्रो फाइनल
तर 1983 ची
क्रिकेट वर्ल्ड कपची फाइनल
कॉलेज बंक करुन पाहिलेले
मिथुनचे हाऊसफुल्ल पिक्चर
जीनतची कुर्बानी
अमिताभ-शत्रुचा दोस्ताना
धर्मेन्द्रचा ओरिजिनल ढाई किलो का हाथ
जीतेन्द्र-श्रीदेवीचे आचरट विनोद
अमजद-कादर-शक्ति कपूरची
विचित्र विनोदी व्हिलनगिरी
राजेश खन्नाचा रोमँटिक अंदाज
थिएटरमधली वीस वीस आठवडे
ओसंडणारी गर्दी
ब्लैक मधे तिकीट घेताना
केलेली मारामारी
सर्व काही आता इतिहास होउन गेलं
आठवणींच्या कप्प्यात मात्र सुरक्षित राहून गेलं
आजकाल आता ती असोशी नाही
ऊर फाटेस्तोवर धावून
" फर्स्ट डे फर्स्ट शो " *पाहणं नाही
सतराशे साठ चैनल्स वरुन चोवीस तास
सिनेमे आणि मनोरंजन कोसळत असतं
पण त्यामधे आता ती पूर्वीची
हूरहूर अन अप्रूप नाही
खुप वेळ try करून एकदाचा
"तिने" उचललेला फ़ोन नाही
तिच्या बापाने नाहीतर भावाने
फोनवरून दिलेल्या शिव्या नाहीत
फेसबुक, व्हाट्सएप, एस एम् एस
आणि मोबाइलच्या जमान्यात
टेलीफोनची गम्मत नाही
तासन तास बिल्डिंग खाली उभं राहून
वाट पाहणं नाही
मनातलं कळवण्यासाठी
रात्र रात्र जागून पत्रं लिहिणं नाही
सेकंदात फेसबुक वर अपडेट होण्याच्या जमान्यात
पत्राची वाट पाहण्यातली आतुरता आणि मजा नाही
हातातून निसटुन गेलेल्या वाळुच्या कणांसारखं
हे सारं केव्हा निसटुन गेलं ओंजळीतून
खरं तर कळलंही नाही
पण आयुष्याच्या मध्यान्ही
हे सारं आठवताना खुदकन हसतो
भुतकाळाच्या हिंदोळ्यावर
कितीतरी काळ झुलत राहतो
खरंच तो काळ किती सुन्दर होता
सारं काही साधं, सरळ नि सोपं होतं
यंत्र आणि माणसंसुद्धा
आता माणसांचीच यंत्र झालीत
आणि यंत्र माणसांसारखी वागू लागलीत
प्रेम, स्नेह, आदर, जिव्हाळा
हे शब्द आता फ़क्त शब्द कोशातच सापडतात
तरीही जुनी मित्र मंडळी भेटली
की तेवढ्या पुरते जिवंत होतात
तेवढ्या पुरते जीवंत होतात.
सारे सारे निघून गेलेत
"कहीं दूर, कहीं दूर"
" आपल्याला या पैकी काही आठवते का ?????
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा