सोलापुरात येत्या जानेवारी महिन्यात ३४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन भरणार आहे. या संमेलनात वनमहर्षी मारूती चित्तमपल्ली व बी. एस कुलकर्णी या दोन्ही ज्येष्ठ पक्षिमित्रांच्या सन्मानार्थ काही विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
डॉ. मेतन फाउंडेशनने आयोजिलेल्या संमेलनासाठी सामाजिक वनीकरण व महाराष्ट्र वन विभागाच्या सोलापूर कार्यालयांचे सहकार्य लाभणार आहे. 'माळरान-शिकार पक्षी आणि संवर्धन' या संकल्पनेतून भरणाऱ्या या संमेलनाची माहिती डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यक्ती मेतन यांनी दिली. सोलापुरात ७, ८ व ९ जानेवारी २२ रोजी हे संमेलन आहे. एप्रिल महिन्यात हे संमेलन घेण्याचे नियोजन केले होते. सोलापूरचे ज्येष्ठ पक्षिमित्र प्रा. निनाद शहा यांची या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच निवड झाली आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा