मागील निवडणुकीत स्वबळावर लक्षवेधक यश मिळविलेल्या चिपळुणातील कॉंग्रेसची गेल्या अनेक वर्षातील स्थिती गटबाजीच्या चक्रव्युहात अडकल्यासारखी झाली आहे. जिल्हा कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी अनेकवेळा जिल्हाध्यक्ष पदभार बदलण्यात आले. मात्र, चिपळुणातील गटबाजी संपविण्यात कोणत्याही जिल्हाध्यक्षांना यश मिळालेले नाही. नवे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे गटबाजीचे चक्रव्यूह कसे भेदतात याकडे चिपळुणातील कॉंग्रेसप्रेमींचे लक्ष लागले आहे.
गेली अनेक वर्षे चिपळुणातील अंतर्गत गटबाजीला खतपाणी घालण्याचे कामदेखील पक्षातील काही जबाबदार व वरिष्ठ नेत्यांनी सुरू ठेवले. स्वतःच्या अस्तित्वासाठी पक्ष वाढविण्यापेक्षा गटबाजीला खतपाणी घालून कायम चर्चेत राहण्याची राजकीय खेळी नेत्यांकडून केली जात आहे. त्यामुळे आता नव्या जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा