Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

काव्यपुष्प

    काव्यपुष्प

-----------------------
 कवी केशवसुत 

 ते जनक आधुनिकतेचे
नवमराठी कवितेचे
शब्दाचा अक्षय भाता
केशवसुतांची कविता
जणू दुसरी भगवतगीता
केशवसुतांची कविता

शब्दांचे रचूनी इमले
समाज घडविण्यासाठी
कृष्णाजी गुरुजींनी धरली
हातात खडू अन काठी
नव्या मनुतील नवा
शिपाई घडविला होता
शब्दाचा अक्षय भाता
केशवसुतांची कविता
जणू दुसरी भागवत गीता
केशवसुतांची कविता

हतबल झाली जनता
बेबंदशाहीच्या पुढे
कृष्णासम धावून आले
कृष्णाजी केशव दामले
अखंड जगी दुमदुमली
मग तुतारीची जयगाथा
शब्दाचा अक्षय भाता
केशवसुतांची कविता
जणू दुसरी भागवत गीता
केशवसुतांची कविता

आम्ही कोण म्हणूनि
सांगितले ठणकावूनि
त्या अफाट विद्वत्तेची
आम्ही गातो गाणी
शब्द मागूनी यावे
अशी ज्यांची विद्वत्ता
शब्दाचा अक्षय भाता
केशवसुतांची कविता
जणू दुसरी भागवत गीता
केशवसुतांची कविता

 अरुण मोर्ये
जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी दक्षिण
कोकण मराठी साहित्य परिषद
------------------------------------------
 नवरात्र यावे दर महिन्याला..…


वाटते मज आई अंबिके गं
नवरात्र यावे दर महिन्याला ।
दर महिन्याच्या नऊ दिनी तरी
सुरक्षित राहू दे माझ्या बहिणीला ।।

ऐकलंय मी या नवरात्रात कोणी
महिलांना कधीच छळत नाही ।
त्या उघड्या दिसणाऱ्या तनावर
कोणाची नजर कधीच वळत नाही ।।

काही असो पण मला गं आई
माझी बहिण सुरक्षित पाहिजे ।
तिच्यासाठी तुझे असणे मात्र
इथे आई गं नियमित पाहिजे ।।

पोथी, पुराणे ऐकतील तरुण
विचार चांगले नेहमी करतील ।
उपवास असता तुझा तर मग
महिलांना किती ते मान देतील ।।

श्रमदान करायचे ते कितीही करू
पण खरंच असं काहीतरी कर ना ।
तुझ्या या लेकरांना जरा गं आई
तूच आता काहीतरी दम भर ना ।।

किती आनंदी क्षण असेल ते गं
ज्यावेळी मुलींना मिळेल सन्मान? ।
वासना मिटेल मानवांच्या मनाची
मुखी नसेल कोणाच्या शब्दही घाण ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

शामलाक्षरी

शामल मेघ गर्जती
 कडाडते विद्युलता
शामल धैर्य धाडसे
धरी मनी  शितलता ॥
शामल-  काळे, मुलीचे नाव
~~~~
सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड

----------------------------------
परोपकारी

वृक्षे उन्हात
तटस्थ उभे राही
सत्पुरुषात

सावली देणे 
मंत्र जपती सदा
कामास येणे

परोपकारी
वृत्तीच जपतात
आनंद दारी

सौ उषा राऊत
------------------------------

अंबाबाईचा घालतो गोंधळ 
आतूर झालो तुझ्या दर्शना
फुले,हार, गुलाल उधळून 
आशिर्वाद देई भक्तांना 

सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.
--------------------------------
 वैष्णव विचार साहित्य मंच पुणे आयोजित....

मुक्तकाव्यलेखन

विषय- स्त्रीवर होणारे अत्याचार..अन्याय

शीर्षक -बाई बाहेरची

बाहेरची बाई,बाई का नसते?
नजरेत आपल्या,आई का नसते?

पापीष्ट नजरा तिला का हेरतात?
एकटी पहाता,गिधाडे ती धरतात!

छळून पिळून बरबाद का करतात
अर्धमेला जीव,का तो ही मारतात

आई,बहीण,मुलगी नात्यात असते
तरीही बाहेर नजरेत का ती नसते

जन्म देत माणसा,संगोपन करते
माणसाच्याच हातून,तरी का मरते

श्री कृष्णा दामोदर शिंदे
इंदापुर पुणे

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment