Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोल्हापूरकरांना मदतीची प्रतीक्षाच ; केंद्रीय पथकाकडून जुजबी पाहणी; राज्याकडूनही अपेक्षाभंग झाल्याची टीकाकोल्हापूरकरांना मदतीची प्रतीक्षाच ; केंद्रीय पथकाकडून जुजबी पाहणी; राज्याकडूनही अपेक्षाभंग झाल्याची टीका

कोल्हापूर : महापूर ओसरून अडीच महिने झाल्यानंतर राज्य शासनाने दिलेली मदत अत्यंत अपुरी आहे. या मदतीवर शेतकरी संघटनांनी टीकास्त्र सोडले आहे. दुसरीकडे केंद्र शासनाच्या पथकाने पाहणीचा दौरा निव्वळ उपचार होता. ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार मदत मिळेल, असे या पथकाने घोषित केले आहे. त्यानुसार मोजकीच मदत मिळणार असल्याने पूरग्रस्तांना तोही आधार तुटताना दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. महापुराने प्रचंड प्रमाणामध्ये वित्तहानी झाली. कित्येक घरे, दुकाने यांची पडझड झाली. हजारो एकर शेतीतील पीक उद्ध्वस्त झाले.

अपुरी मदत

महापुरानंतर पाहणीचे दौरे सुरू झाले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे दौरे झाले. मदतीच्या घोषणा केल्या; पण वेळकाढू भूमिका घेतली. मराठवाडा – उत्तर महाराष्ट्र येथील महापुराचा आढावा घेऊन राज्याला एकच निकषाने मदत करू, असा नवा पवित्रा राज्य शासनाने घेतला आहे. मदत मिळण्याबद्दल ग्रामीण भागात आंदोलने सुरू झाली. याची दखल घेऊन अखेर राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषानुसार प्रति हेक्टर बागायती शेती (१३,५००), जिरायती (१०, ८००), फळबाग (१८,०००) रुपयेप्रमाणे मदत जाहीर केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७४ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असताना अवघी ८५ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. पूरग्रस्तांची घोर फसवणूक झाल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन, शासन निर्णयाची  होळी, शंखध्वनी करीत जोरदार विरोध चालवला आहे. विरोध मावळण्यासाठी मंत्र्यांना किल्ला लढवावा लागत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यात अजूनही १० हजार हेक्टर शेतजमिनीचे पंचनामे अपूर्ण आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीने बदल करणार असल्याचे सांगितले आहे, असे स्पष्टीकरण करतानाच यासाठी काही कालावधी जावा लागेल, याची कबुलीही दिली आहे.

केंद्रीय पथकाची धावती भेट

जुलैमध्ये महापूर येऊन गेला, पण केंद्र शासनाला आता जाग आली आहे. अडीच महिने उलटल्यानंतर केंद्र शासनाचे पाहणी पथक पश्चिम महाराष्ट्रात येऊन धडकले. एकाच दिवशी कोल्हापूर – सांगली या दोन जिल्ह्यांत पाहणी केली. पूर व भूस्खलन याची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात भूस्खलन झालेल्या जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागाकडे हे पथक फिरकलेही नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीतच माहिती घेऊन हा विषय गुंडाळला गेला. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यात त्यांनी भेट दिली. पूरग्रस्तांच्या समस्या मुळातून समजून घेण्याऐवजी ओझरता संवाद साधून पाहणी दौरा आटोपला. या पद्धतीवर शेतकरी नाराज न होतील तर नवल. कुजलेली पिके काढून टाकण्याचा खर्च करावा लागला. दुबार पेरणी करावी लागली. त्याचे पीक चांगले आले आहे. हे पाहून आधीच्या नुकसानीचा अंदाज केंद्रीय पाहणी पथकाला आता कसा येणार? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

निकष निराशाजनक केंद्रीय पाहणी पथकाचे प्रमुख अवनिष कुमार यांनी ‘एनडीआरएफ’च्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण) निकषानुसार मदत मिळेल, असे सांगितले आहे. या बैठकीतच शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी नाराजी व्यक्त केली. ‘एनडीआरएफ निकषांनुसार मिळणारी मदत खूपच कमी आहे. नुकसानीच्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे. मदतीसाठी व पुनर्वसनासाठी एक राष्ट्रीय धोरण असावे, अशी मागणी त्यांनी केली. एनडीआरएफच्या निकषानुसार हाती भरीव काही मिळण्याची शक्यता नाही. उदाहरणार्थ एक किलोमीटर रस्त्याची डागडुजी करण्यासाठी लाखभर रुपये मिळतात. राज्य शासन इतक्याच अंतराचा रस्ता करण्यासाठी २५-३० लाख रुपये खर्च करते. लाखभर रुपयात काहीच काम होऊ शकत नाही. ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराचा धोका कायमचा बनला आहे. महापुराच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पुलांना अधिक प्रमाणात कमानी उभारणे गरजेचे आहे. त्याचा विचार करून केंद्र शासनाने मदत केली पाहिजे. यासाठी मदतीच्या निकषांमध्ये बदल करण्याची शिफारस केंद्रीय पथकाने करावी. आपल्या धोरणात तसा बदल केला पाहिजे,’ असे मत खासदार धैर्यशील माने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment