सत्कोंडी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अरूण मोर्ये यांची सलग सहाव्यांदा निवड
रत्नागिरी : सत्कोंडी ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी अरूण तुकाराम मोर्ये यांची एकमताने निवड झाली. सलग सहावेळा ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत हुशार , जाणकार व योग्य व्यक्तीची निवड सातत्याने होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन झाल्यापासून लौकीकाला साजशे गावातील विविध प्रकारचे तंटे मिटवण्याचे काम या समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गावपातळीवरील तंटेबिखेडे गावातच सोडवावेत, त्याचे योग्य मूल्यमापन व्हावे व पुनश्च गावाला तंटामुक्त करावे, या प्रमुख हेतूने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये सत्कोंडी, पन्हळी, कांबळे लावगण या तिन्ही गावातील नागरिकांनी पुन्हा एकदा अरुण मोर्ये यांची निवड केली आहे.
अरुण मोर्ये हे अनेकवर्ष समाजसेवेत अग्रणी आहेत. तसेच ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कायदासाथी म्हणून कार्यरत आहेत. तर ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांचा दबदबा असून ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती चे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आहेत. निवडीनंतर मोर्ये म्हणाले की, तिन्ही गावातील ग्रामस्थांनी एकमताने माझी निवड केली आहे, ती निवड सार्थ करण्यासाठी प्रयत्न करेन. तसेच गावातील प्रलंबित असलेले दिवाणी व इतर तंटे कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्व सदस्यांच्या सहकार्यान मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच घेतलेल्या निर्णयांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अंतिम स्वरुप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा