काव्यपुष्प
-----------------
आपट्याच्या पानांनी दस-याने सजावे
नात्यांच्या ओंजळीने मनसोक्त लूटावे
भेटला माझा सखा प्रत्येकाला वाटावे
मन आनंदाने मोहरून जावे
प्रेमाच्या कवेत हलकेच विसावून जावे
असे आज सिमोल्लंघन व्हावे
दस-थाने माणुसकीने वर्षांवे
दसऱ्याच्या मनभर शुभेच्छा
सौ काव्या रितेश पेडणेकर
जाकिमि-या, रत्नागिरी
---------------------------------
मी रावण बोलतोय...
मला जाळून खरंच का?
प्रश्न तुमचे सुटणार आहेत
उलट
संस्कृतीच्या नावाखाली लुटेरे
जनतेस लुटणार आहेत!
तुम्ही फक्त जाळा माझे पुतळे
गल्लीबोळात.. नाक्या नाक्यावर..
हाती धनुष्य बाण घेऊन
रामाचा वेश परिधान करून..
पण तुमच्याच आई बहिणींची
कापली जाताहेत नाकं..
नागवलं जातंय तनाला आणि मनालाही ..
काढली जातेय धिंड..
तुमच्या बेगडी अस्मितेची..
गावभर...
तेव्हा मात्र तुम्ही
गप्पच बसणार
हात गांडीवर ठेवून
माना मोडेपर्यंत वाकवून
एखाद्या षंढासारखे..!
अजून किती दिवस जाळत
बसणार मला..
कधीतरी जरा डोळे उघडून
नीट बघा..
आठवेल तुम्हाला सीता आणि शुर्पनखाही..
खात्रीनं सांगतो
तेव्हा तुम्हीही नक्कीच बुचकळ्यात पडाल,
कोण योग्य
कोण अयोग्य
राम.. रावण.. का दोघेही..?
कधी कधी तर मला किव येते..
तुमची आणि बुद्धीचीही ..!
विज्ञान युगात राहणारे तुम्ही
कुरवाळत बसता अज्ञान
अरे मुर्खानो..
तुमच्या डिग्रीच्या सुरळ्या करा
आणि कोंबा मलद्वाराच्या मुखात..
तितकी ही किंमत नसावी
बहुधा त्यांची..!
का?
हा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला..
आता हेच बघा ना..
माझी माता मानव
माझा पिता मानव
मग मी कसा राक्षस?
तोही दहातोंडाचा..
मी देखील तुमच्यासारखाच..
योनिज..
मग हा असा जन्म शक्य तरी आहे का?
का जन्म झाल्यानंतर
नाळ तुटल्यानंतर
एकाएकी उपटली ही दहा तोंड..
अरे वेड्या नो..
किती फसवाल भोळ्या जनतेला
आणि स्वतःलाही..!
पेटवणारे .. जाळणारे..
बदला ही तुमची ओळख..
तरच बदलेल..
हे भयानक वास्तव!
नाहीतर युगे युगे फक्त पुतळे
जळत राहतील..
बघे बघत राहतील
आणि यावर पोळ्या भाजणारे
मनसोक्त जगत राहतील
अनादी अनंत काळ
बेलगाम आणि निर्धास्तपणे...!
✍️ अरुण मोर्ये
सत्कोंडी, रत्नागिरी
-------------------------------------------------
झेंडुची फुले - आंब्याची पाने
सजवती दारी सुंदर तोरण
आनंदाचे रंग भरुनी
रांगोळीने सजले अंगण !
आपट्याची पाने लुटुनी
दृढ होते नात्यांची गुंफण
सुवर्णापरि जपून ठेवू
दसऱ्याचा हा सोनेरी क्षण !
माधुरी डोंगळीकर
पुणे
------------------------------------
नटली सृष्टी
झाडे ,वेली,फुलांनी
पर्जन्य वृष्टी
झाडे लावता
सुख समृद्धी घरा
मित्र मानता
मिळे आधार
पशुपक्ष्यांना सर्वा
सदाबहार
सौ उषा राऊत
--------------------------------------
सोहळा विजयादशमीचा
जाहले संपन्न युद्ध
राम रावणाचे दिनी
महिषासुर ही गेला
मातेच्या स्त्री शक्तींनी
वाईट प्रवृत्तींचा अंत
होता धन्य झाली अवनी
देवी देवतांचा उदय नावे
जन्मली विजयादशमी
सोने समजुनी आपट्याची
पाने देण्याची प्रथा प्रचलित
चाले पूर्वीपासून काल ही
आजही उद्या ही अखंडित
पूजा अर्चा सारी पाट लक्ष्मीचा
करीत सोहळा निर्मळ आनंदाचा
नवनवीन वस्तूंचे करीत आगमन
घरोघरी डोलारा फुलवी चैतन्याचा
मिरवीत येती आप्तिष्ट लेवून
देहावरी सुखी माणसाचा सदरा
ओठांवरी स्मित हास्य ठेवुनी
पार पाडी क्षण मोत्याचा दसरा
- नयन धारणकर
--------------------------------------
पवित्र दसरा
दसरा आहे पवित्र सण
हिंदू परंपरेची शान,
साडे तीन मुहूर्ताचा दिवस
संस्कृती आपली महान.✍️
आपट्याचे पान
त्याला सोन्याचा गाभा,
देऊनी ते एकमेकांना
वाढवू उत्सवाची शोभा.✍️
असत्याचा विनाश
सत्याची कास,
विजयाचा जल्लोष
नाविन्याचा ध्यास.✍️
संकल्प करू नवनिर्मितीचा
मनी धरू नव्या इच्छा,
सुख समाधान ऐश्वर्य लाभो
ह्याच मनापासून शुभेच्छा
श्री. योगेश ग. शेट्ये (राजयोग)
-------------------------------------
राम-रावण विचार मंथन
श्रद्धाआणि अंधश्रद्धा
दोन वेगळ्याच गोष्टी
मग रावणाच्या दहनाने
का व्हावे आपण कष्टी--‐---
रावणाचे दहन
वाईट गोष्टींचे हनन
का बरे त्यावर
विचारांचे मंथन ?
शुर्पणखेचे कृत्य
सीतेने केले का?
मग दोघींमध्ये
साम्य तरी आहे का ?
रामाच्या वृत्तीचे
गुढीपाडव्याने स्वागत झाले
अन् रावणाच्या वृत्तीचे
दसऱ्याला दहन झाले
राम ,रावण म्हणत
आपण का कुढायचे?
आपल्याच रूढी झिडकारून
कोणा पुढे नमायचे?
रावणाची बाजू मांडत
वाईट वृत्तींना पोसावं का ?
अन् रामाच्या चारित्र्यावर
आपणच हसावं का ?
विज्ञानाच्या नावाखाली
रूढीपरंपरा हरवल्या
रितीरिवाज विसरून
पार कोरड्या झाल्या
श्रद्धा हरवल्या म्हणून
देवही चोरीला जातात
कुठे आहे तुमची प्रगती?
आजही नरबळी होतात
श्रद्धेच्या जागी श्रद्धा असूदे
रितीच्या जागी रित चालूदे
गरजेचे बदल विज्ञानात
पाहिजे तेवढे होऊदे
राम,रावण करण्यापेक्षा
सणांचा आनंद पसरूदे
रूढीपरंपरा जपण्यासाठी
हरवलेली माणसे सारी
पुन्हा एकदा एकत्र येवूदेत
पुन्हा एकदा एकत्र येवूदेत
सौ. काव्या रितेश पेडणेकर
जाकिमि-या, रत्नागिरी
---------------------------------------------
पीछे आया नही कोई...
मैं मिलता हूँ सबकों मुझ जैसा मिला नही कोई।
लिखता हूँ रोज़ ख़ुदको लेकिन पढ़ता नही कोई।
लिखतें लिखतें मशहूरतो कर दिया मुझे किसके
लिख रहा हूँ यह सवाल करने आया नही कोई।
देखते है पहचान ते सब नज़दीक से लेकिन
मेरे क़रीब आकर ख़बर पूछने आया नही कोई।
सब लोग हमारी आँखे और चेहरा देखकर चले
जाते थे बस दिल तक ही आया नही कोई।
दिन गुज़र ते गए हम वक़्त का हाथ पकड़कर
आगें बढ़ते गए हमारे पीछे आया नही कोई।
नीक राजपूत
9898693535
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा