Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शिक्षकांसाठी अविरत झटणारे शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश पाध्ये यांचा सन्मान सोहळा पाचल येथे संपन्न
 शिक्षकांसाठी अविरत झटणारे शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश पाध्ये यांचा सन्मान सोहळा पाचल येथे संपन्न


पुरोगामी शिक्षक संघटनेचे जेष्ठ शिक्षक नेते मा . प्रकाश पाध्ये यांची नुकतीच रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली . त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा पुरोगामी परिवाराच्या राजापूर शाखेकडून मा . ल . र . तथा भाईसाहेब हातणकर सभागृह पाचल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा दिमाकदार असा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला . याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी प्रा . शिक्षक पतपेढीचे विद्यमान चेअरमन मा चंद्रकांत पावसकर जेष्ठ शिक्षक नेते पतसंस्थेचे प्रमुख सल्लागार मा . बांडागळे गुरुजी , पुरोगामी राज्य कार्याध्यक्ष व संचालक गटनेते बळीराम मोरे , लांजा शाखेचे संचालक संजय डांगे , तज्ञ संचालक संजय सुर्वे , पाचल उपसरपंच किशोरभाई नारकर , पुरोगामी परिवराकडून जिल्हा नेते प्रदीप पवार , जिल्हा सरचिटणीस जगदीश कांबळे , जिल्हा कार्याध्यक्ष सुनील दळवी , जिल्हा उपाध्यक्ष जौरत खेड शाखेचे अध्यक्ष संतोष चव्हाण , चिपळूण शाखेचे अध्यक्ष शशिभाऊ सकपाळ , सरचिटणीस अमोल बोभस्कर , लांजा शाखेचे सरचिटणीस मधुकर चौगुले , राजापूरमधील पदवीधर अध्यक्ष सुनील शिवगण , माजी तज्ञ संचालक मेघनाथ गोसावी , अखिलचे रघुवीर बापट , पुरोगामीचे सल्लागार मा . सुरेश


 साळवी , शिक्षण विस्तार अधिकारी श्री . कडूसर केंद्रप्रमुख श्री . कोरगावकर व श्री . खानविलकर हे उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या प्रारंभीच सर्व उपस्थित मान्यवरांना तालुका शाखेच्यावतीने सन्मानीत करून राजापूर पुरोगामीसाठी भाग्यशाली ठरलेल्या मा . प्रकाश पाध्ये , उपाध्यक्ष शिक्षक पतपेढी यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देवून जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते राजापूर शाखेकडून सन्मान करण्यात आला तसेच खेड , चिपळूण , देवरुख व लांजा शाखांबरोबर पाचल ग्रामपंचायत , तालुका लांजा सर्व शिक्षक , राजापूर पदवीधर , शिक्षक संघ , अखिल शिक्षक संघ आणि जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटना यांचेकडूनही श्री . पाध्ये यांचा सत्कार करण्यात आला . यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नागिरी जिल्हा पतपेढीचे चेअरमन मा . चंद्रकांत पावसकर यांनाही सन्मानपत्राने पुरोगामीकडून सन्मानीत करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मा संजय डांगे संचालक लांजा यांचा सत्कार केला गेला . याप्रसंगी संघटनेतील नूतन शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड झालेल्या मा सौ स्मिता साळुंखेमॅडम व मा . श्री . सखाराम कडूसर यांचा राजापूर पुरोगामीकडून शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला . या कार्यक्रमाचे औच्यत्य साधून पुरोगामीचे सदस्य राहिलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करून यामध्ये सुभाषिता कोंडगेकर , शीतल कुंडेकर , स्नेहा खैरे , राधिका गुण्ये , सुयोगा जठार , अशोक पवार , सदानंद ताम्हणकर , गंगाराम हडशी , प्रकाश पांचाळ , विजय जाधव व भास्कर प्रभुदेसाई यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला . यानंतर पुरोगामी जिल्हा नेते प्रदीप पवार यांचे सहकार्यातून एकूण 60 हजाराचे उपयुक्त असे समकालीन प्रकाशन पुणे यांचेकडून प्राप्त ग्रंथसंच राजापुरातील एकूण 20 शाळांना पाहुण्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले . सन्मान समारंभाबाबत मनोगत व मार्गदर्शन करताना प्रथम जिल्हानेते प्रदीप पवार यांनी सत्कारमूर्ति मा पाध्ये यांच्या एकूणच संघटनात्मक कार्याचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या व हा कार्यक्रम आयोजित केल्याबाबत शाखेचे अभिनंदनही केले . शिक्षक पतपेढी संचालक गटनेते व राज्याचे कार्याध्यक्ष बळीराम मोरेसर यांनी आपल्या ओघवत्या भाषणात पाध्ये यांच्या कामाचे कौतुक करत राजापूर शाखेचेदेखील कौतुक केले . संघटन कार्याची गरज विषद करताना भविष्यात सर्व संघटनांनी एकत्र येवून काम केले नाही तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल . आणि यासाठी काम करण्याची किती गरज हे लक्षात आणून दिले . तर जेष्ठ शिक्षक नेते आणि सल्लागार मा . बांडागळेगुरुजी यांनी आपल्या भाषणात पाध्येसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सत्कार ही आनंद देणारी घटना आहे . त्यासाठी आयोजकांचे आभार मानले . शिक्षकांच्या विविध संघटना व विविधस्तर यावर अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य करत राजापुरातरील पाचल विभागातील एकसंघ शिक्षकांबाबत विशेष उल्लेखही केला . यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी तालुका अध्यक्ष साळवी गुरुजी यांनी सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी कामात सहभाग घेणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले . यानंतर प्रमुख पाहुणे व पतपेढी चेअरमन मा . चंद्रकांत पावसकर यांनी पतपेढीचे कामकाज यावर सविस्तर असे भाष्य करताना महायुतीचा जाहीरनामा तसेच त्याउपर झालेले काम विविध ठेव व कर्ज योजना याची माहिती देत भविष्यात स्कोअर बँकिंगच्या दृष्टीने होऊ घातलेल्या कामाची कल्पना दिली . पतपेढी शाखेपासून भौगोलिकदृष्ट्या खूप दूर असणाऱ्या विभागात सभासदांना जवळ सेवा देता यावी या आपल्या मागणीच्या अनुषंगाने सेवाकेन्द्र ( विस्तारकक्ष ) सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आशावादी मत व्यक्त केले . यानंतर सत्कारमूर्ति श्री . पाध्येसर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सर्वांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास , प्रेम व आपुलकी यामुळे मी भारावून गेलो . मला मिळालेली संधी ही माझी संघटना व विशेष करून बळीराम मोरे यांचेमुळे मिळाली याचा उल्लेख केला . भविष्यात मी माझे शिक्षकांप्रती असणारे कार्य यापुढेही असेच चालू राहील असे अभिवचन देत सर्वांना मनापासून धन्यवाद दिले . या कार्यक्रमाला पुरोगामीचे पदाधिकारी व सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून कार्यक्रमाचा उत्साह वाढविला . कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन हे उत्तम रीतीने केल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले . या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष जयेश तेलंग , आभार सरचिटणीस अनंत रामाणे तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा कोषाध्यक्ष श्री अनाजी मासये यांनी केले .


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा