जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना दक्षिण रत्नागिरी भागात पक्ष वाढवायचा नाही का? माजी सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांचा प्रश्न
राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेबांना संपुर्ण महाराष्ट्रमध्ये पक्ष बळकट करण्याचा उद्देश आहे. त्यांनी नेहमीच सहकार क्षेत्रामधून सर्वांना संधी देवून पक्ष बळकट करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष मजबूत आहे.
परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते नेहमीच सहकाराबाबत उत्तर विभागातील लोकांना संधी देवून दक्षिण रत्नागिरीवर अन्याय करत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात रत्नागिरी मध्यवर्ती जिल्हा बॅंक ही सहकार क्षेत्रातील कणा असलेल्या बॅकेच्या संचालक निवडणूकीमध्ये लांजा राजापूर तालुक्यावर नेहमीच अन्याय वरिष्ठ नेते करत आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये सहकार क्षेत्रात काॅग्रेस व राष्ट्रवादीचे नेहमीच वर्चस्व राहिलेला असताना सुध्दा जिल्हा बॅकेच्या निवडणूकीमध्ये हा अन्याय का केला आहे?
असा प्रश्न सर्वसामान्य कार्यक्रर्ते विचारत आहेत. जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीमध्ये सहकार पॅनेल तयार केले असून एकूण दहा जागा राष्ट्रवादी पक्षाला दिल्या आहेत. पण यामध्ये लांजा राजापूर तालुक्याला वरिष्ठ नेत्यांनी प्रतिनिधीत्व देणे अपेक्षित असताना सुध्दा या दोन्ही तालुक्यात एकही प्रतिनिधी दिला नाही. यावरून असे दिसून येते कि वरिष्ठ नेत्यांनी हे तालुके इतर पक्षाला आंदण देण्याचे काम केले आहे.
वरिष्ठ नेत्यांना या मतदार संघामध्ये पक्ष बळकट करावयाचा नसल्यास त्यांनी जाहिरपणे सर्वसामान्य कार्यक्रर्त्यांना सांगावे जेणेकरून आम्ही सर्व कार्यक्रर्ते याची दाद पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष पाटील साहेब यांच्याकडे मागतो.
एके काळी लांजा राजापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये काॅग्रेस राष्ट्रवादीचा दबदबा असतानाही यावेळी कुणाच्या सांगण्यावरून व कोणत्या पक्षाला मोठे करण्यासाठी या तालुक्याला डावलले आहे याचा जाब वरिष्ठ नेत्यांना द्यावा लागणार आहे.
आता जे सहकार पॅनेल मधील उमेदवार जाहिर केले आहेत. त्यामधील कित्येक उमेदवार आपली अगोदरची संस्था गेल्या पाच वर्षांत टिकवू शकले नाहित. मग त्यांना आता उमेदवारी देवून इतरही संस्था बुडवण्याचे काम वरिष्ठ नेते करत आहेत. तुमच्या या निर्णयामुळे तालुक्यातील सहकारवर चालणाऱ्या संस्था बंद पाडण्याचे काम आपण करत आहे असे दिसून येते.
मग तुम्हास सहकार चालवण्याचा अधिकार राहतो का? हा प्रश्न आपण एकदा आपल्या मनाला विचारावा. तसेच अशा लोकांना का संधी दिली यांचाही विचार करावा.
लांजा राजापूर तालुक्यांमध्ये सहकार रूजवण्याचे काम माजी आमदार कै. शिवाजीराव सावंत कै. छोटूभाई देसाई यांनी केले. तो सहकार वाढवण्याचे काम राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शामराव पानवलकर यांनी केले. पण आपण यांनाही विश्वासात घेतले होते का? उत्तर रत्नागिरी भागातील वरिष्ठ नेत्यांनी दक्षिण रत्नागिरी भागावर हा अन्याय का केला?
यावरून जर या तालुक्यातील उमेदवारांनी बंडखोरी करून निवडणूक लढविण्यास याला जबाबदार कोण? त्यावेळी त्या उमेदवारांवर नाराज होण्याचा आपणास कोणताही अधिकार राहत नाही
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा