अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे करियरचे मार्गदर्शन मिळणार
आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत जि.प.माध्यमिक शिक्षण विभागाचा पहिलाच उपक्रमाचा 22 रोजी शुभारंभ
रत्नागिरी प्रतिनिधी
आझादी का अमृतमहोत्सव या उपक्रमा अंतर्गत अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करियरचे मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून विविध तज्ज्ञांचे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहे. ही ऑनलाईन मुलाखत लिंकव्दारे प्रक्षेपित केली जाणार असून याचा निश्चितच फायदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणार असल्याचे माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली आहे.
कोरोनानंतर पहिल्यांदाच महाविद्यालये सुरु झाली आहेत, कोकणातील मुले स्पर्धा परिक्षाव्दारे गुणवत्ता सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाविद्यालयीन शिक्षणाच्या पहिल्याच टप्प्यात त्यांना विविध क्षेत्रातील अधिकारी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या वैचारिक दृष्टीकोनात चांगला बदल घडू शकतो. या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, मुख्यकार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये संपूर्ण आठवडा ऑनलाईन मुलाखत कार्यक्रम होणार असून याचे ऑनलाईनच प्रक्षेपण होणार आहे, या मुलाखती पत्रकार जान्हवी पाटील या घेणार आहेत. या कार्यक्रमाव्दारे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे करियर कशा पध्दतीने घडले, त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अशा विविध विषयांवर चर्चात्मक मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी या उपक्रमात सर्व महाविद्यालयांनी सहभागी घ्यावे असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. 22 ऑक्टोबर रोजी या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार असून पहिली मुलाखत ऑनलाईनव्दारे प्रक्षेपित केली जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी सांगितले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा