गणपतीपुळे श्री चंडिका देवी मंदीरामध्ये नवरात्रोत्सवास सुरवात
कोवीड ची पूर्ण दक्षता =पंचकमिटी परिस्थितीवर लक्ष ठेऊन !!
गणपतीपुळे : अभिजित घनवटकर
गणपतीपुळे येथील श्री चंडिका देवीच्या मंदीरामध्ये गुरुवारी सकाळी 08 :00 वाजता घटस्थापना करून गावचे खोत श्री विजय भिडे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला .
गुरुवारी नवरात्रोत्सवास सर्व ठीकाणी सुरवात झाली असुन प्रत्येक ठीकाणी दूर्गादेवीची मूर्ती आणून नवरात्रोत्सव साजरा केला जातो मात्र गणपतीपुळे त्यास अपवाद आहे या ठिकाणी दूर्गादेवीची पाथीॅव मुतीॅ न आणता फक्त घटस्थापना करून उत्सव साजरा केला जतो या मंदीरामध्ये पोलीस स्थानका मधून मिळालेल्या सुचनांचे पालन करून उत्सव साजरा केला जातो या उत्सव कालावधी मध्ये दररोज वेगवेगळ्या यजमानांना देवीच्या पूजेची संधी मिळत असते सायंकाळी 07 वा मोठ्या प्रमाणात देवीच्या आरतीला ग्रामस्थ हजर असतात कोवीड मुळे गेले दोन वर्षे हा उत्सव चंडिका मंदीरामध्ये पंचकमिटी यांनीच साजरा केला मात्र यावषीॅ या उत्सवाला काही प्रमाणात परवानगी मिळाली असल्याने सध्या मंदीरामध्ये थोड्याफार प्रमाणात गदीॅ दीसून येत आहे आज गुरुवार पासून या नवरात्रोत्सवास सुरवात झाली असुन दरोज आरती कीर्तन तसेच लहान मुलांच्या स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे मात्र पोलीस स्थानका मधून गरबानृत्यास परवानगी मिळणार नसल्यामुळे गरबा प्रेमींचा हीरमोड झाल्याचे बोलले जात आहे गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गरबा नाचल्यास त्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस स्थानका मधून सांगण्यात आले आहे.एकूणच, जयगड पोलिस ठाणे आणि शासनाच्या सर्व शासकीय नियमावलींचे पालन करून गणपतीपुळे येथील श्री चंडिका देवी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा