Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

पॅन इंडिया अवेअरनेस अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे माहितीपर फलकाचे अनावरण


  •  पॅन इंडिया अवेअरनेस अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे माहितीपर फलकाचे अनावरण


रत्नागिरीत जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले सदर फलकाचे अनावरण 


रत्नागिरी प्रतिनिधी:-

 

                           मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळया उपक्रमांचे आयोजन करण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २३/१०/२०२१ सकाळी ९.५५ मिनीटानंतर औरगाबाद येथे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय व मा. प्रमुख आश्रयदाते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व न्यायमूर्ती श्री. उदय ललित कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राध्‍िाकरणाचे मोफत विधी सेवा काेणाला व कुठे मिळू शकते, (ग्रामपंचायत/ पोस्ट ऑफिस) आरोपींचे अधिकार (पोलिस ठाणे ) याबाबतचे माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले. 

                           रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे दि. २३/१०/२०२१ रोजी १०.५५ वाजता  जिल्हयातील एकुण ६६ ठिकाणी सदर माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या माहितीपर फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश अानंद सामंत यांनी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, पोलिस ठाणे याठिकाणी विधी सेवा प्राधिकरणतर्फे माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात येणार असल्याबाबत माहिती दिली.  

                           रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी नगरपरिषद, नाचणे ग्रामपंचायत, खेडशी ग्रामपंचायत, कुवारबांव ग्रामपंचायत, हातखंबा ग्रामपंचायत, रत्नागिरी शहर पोलिस ठाणे, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे, रत्नागिरी पोस्ट ऑफिस, टिळक मेमोरियल पोस्ट ऑफिस, नाचणे पोस्ट ऑफिस आणि शिवाजीनगर  पोस्ट ऑफिस येथे नवीन नियुक्त अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग - १ श्रीमती एस.एच.पाटील, श्रीमती आर.बी.यादव, श्री. एम.डी.महाडीक, श्रीमती एल.पी.रॉड्रीग्ज,  श्री. के.ए.यादव, श्री. एम.आर.काळे, श्रीमती एम.एम.पाटील, श्री. एम.ए.शिंदे,   श्री. पी.आर.भोसले, श्री. एस.एस.नलावडे आणि श्रीमती टी.आर.गुरव,  यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लांजा, राजापूर, दापोली, चिपळूण, खेड, गुहागर आणि देवरूख येथील नगरपालिका, तहसीलदार कार्यालय, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत आणि पोलिस ठाणे अशा एकूण ५३ ठिकाणी माहितीपर फलकाचे अनावरण करण्यात आले आहे.



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा