मुंबई(मोहन कदम/ शांत्ताराम गुडेकर )
महाराष्ट्राची भूमि ही संत, महात्मे आणि पराक्रमी पुरुषांची भूमि आहे। संत ज्ञानदेव, तुकाराम महाराज आदी अनेक संतानी भक्तिमार्गाची शिकवण दिली आणि समाजाला एकत्रित करून माणूसकिचा धर्म शिकविला. राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अशिक्षित आणि अन्यायाने पिचत पडलेल्या समाजाला त्यांच्या हक्काचे जगणे शिकविले, आणि छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी राष्ट्रभक्ति आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श घालून दिला. हे सर्व कार्य एकट्याने होत नाही त्यासाठी एकात्मतेची भावना असावी लागते. जशी लहान-मोठी पाचही बोटे मिळून वज्रमूठ होते त्याप्रमाणे समाजातील सर्व लहान-मोठे घटक मिळून एका संकल्पाने एका प्रेरणेने एक विकासात्मक दृष्टिकोंन समोर ठेऊन संघटना तयार होते, आणि आपल्या प्रगतीचे एक एक पाऊल पुढे पुढे जात टप्प्या-टप्प्याने आपले ध्येय निश्चित करते. अशा प्रकारचे विलक्षण कार्य रत्नागिरी जिल्ह्यातील, देवरूख पंचक्रोशिमध्ये श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील कासारकोळवण या गावामधील शिवशक्ति उत्कर्ष मंडळ, कासार कोळवण या सरकारमान्य रजि. संस्थेने केले आहे.कोंकणातील दुर्गम भागात सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे छोटेशे गाव.शंभो श्री मार्लेश्वर देवस्थानाच्या पवित्र भूमित. श्री सोंबा देवाच्या आशिर्वादाने सामाजिक विकासाची आणि जनहिताची कामे हाती घेऊन सामाजिक क्रांति केली आहे, आणि आपली विशिष्ठ ओळख निर्माण केली आहे. मंडळाच्या त्याच कार्याची दखल घेऊन, प्रभावित होऊन मंडळाला आजवर राष्ट्रीय,राज्यस्तरीय,जिल्हा स्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.मंडळाचे पदाधिकारी यांनी मंडळाचे हितचिंतक उद्योगपती/ समाजसेवक विश्वजित चिंदरकर यांची सदिच्छा भेट घेऊन मंडळाच्या पुढील उपक्रम व वाटचालीबद्दल महत्त्वपुर्ण चर्चा केली.यावेळी मंडळाचे शंकर करंबेले ,एकनाथ कदम ,मोहन कदम ,गजानन करंबेले , रवींद्र करंबेले ,सुनील आलीम , संतोष आलीम आदी मान्यवार उपस्थित होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा