राजापूर तालुक्यातील गोवळ गावचे माजी सरपंच दशरथ कदम यांचे बुधवारी निधन
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील गोवळ गावचे माजी सरपंच, कॉंग्रेस पक्षाचे निस्सीम कार्यकर्ते, जकातनाका येथील आदेश जेन्टस पार्लरचे मालक दशरथ आत्माराम कदम यांचे बुधवारी रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने गोवळ गावासहित संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दशरथ कदम यांना शाहिरी कलेची आवड होती. त्यांनी जाखडीतून आपल्या कलेची जोपासना केली. जाखडीतील अनेक कलाप्रकार त्यांना ज्ञात होते. दशरथ कदम कॉंग्रेस पक्षाचे निस्सीम कार्यकर्ते होते. गेली काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना उपचारासाठी रत्नागिरीत दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा