गणपतीपुळे रत्नागिरी: शासन निर्देशानुसार गणपतीपुळे मंदिर भाविकांसाठी खुले! अभिजित घनवटकर -गणपतीपुळे- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 6 एप्रिल 2021 पासून ते 6ऑक्टोबर 2021पर्यंत सुमारे 6 महिने गणपतीपुळे मधील जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध स्वयंभू गणेश मंदिर सर्व भाविकांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आले होते. त्याचा परिणाम हा गणपतीपुळे पंचक्रोशी मधील सर्व स्तरातील व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीच्या स्वरूपात भोगावा लागला परंतु राज्य सरकारच्या पुनश्च हरि ओम च्या निर्णयाद्वारे कोरोना संक्रमण प्रतिबंधक सर्व उपाय योजना आमलात आणून मंदिर सुरू करण्याचे निर्देश देवस्थान समित्यांना देण्यात आले.त्यानुसार गुरुवारी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर अर्थात नवरात्रीच्या पहिल्या माळेला गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रीं चे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सुरू झाले आहे.या पहिल्याच दिवशी भाविकांचा अल्प प्रतिसाद दर्शनासाठी लाभल्याची माहिती गणपतीपुळे देवस्थान समितीकडून देण्यात आली.यावेळी घटस्थापनेचा दिवस असल्याने प्रत्येकाच्या घरोघरी पूजाअर्चा असल्याने भाविक पहिल्या दिवशी दर्शनासाठी कमी संख्येने आल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.परंतु शनिवारपासून भाविकांची दर्शनासाठी निश्चितच वाढ होईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गणपतीपुळे पंचक्रोशीतील अनेक स्थानिक भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला.या दर्शनासाठी गणपतीपुळे देवस्थान समितीने अतिशय उत्तम नियोजन केले असून शासनाच्या नियमावलीचे पालन करून भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे.त्यामध्ये सकाळी 5ते7स्थानिक ग्रामस्थ, सकाळी 7 ते 12 भाविकांसाठी, दुपारी 1 ते 7 भाविकांसाठी, सायंकाळी 7.30ते 8.30भाविकांसाठी अशा दर्शनाच्या वेळा देवस्थान समितीने ठरविल्या आहेत.तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष पूजा, अभिषेक,आरती तसेच दैनंदिन महाप्रसाद इत्यादी सेवा भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.दरम्यान , गुरुवारी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गणपती मंदिर सुरू झाल्याने मंदिर प्रशासनाबरोबरच
ग्रामपंचायत गणपतीपुळे,सर्व खाजगी आस्थापने, छोटे - मोठे सर्व प्रकारचे व्यावसायिक यांनी गुरुवारी 7 ऑक्टोबरपासून नवीन नियमावली नुसार सुरू होणाऱ्या अनलॉक बाबत आपली पूर्ण तयारी केली आहे.
गणरायाच्या कृपेने पुढील काळात महामारी ने झालेले आर्थिक सामाजिक नुकसान भरून पुन्हा एकदा हे जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन स्थळ सुजलाम सुफलाम होवो ,अशी प्रार्थना गणपतीपुळे येथील सर्वच स्थानिक ग्रामस्थांबरोबर लहान मोठ्या पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा