चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश झा यांच्यावर हल्ला करण्यात आला असून चेहऱ्यावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश झा यांच्या 'आश्रम-३' या वेबसीरिजच्या चित्रीकरणस्थळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हल्ला केला.
भोपाळमध्ये हे चित्रीकरण सुरू होते. 'आश्रम-३' या नावाला आक्षेप घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणस्थळी जाऊन हैदोस घातला. त्यांनी चित्रीकरणस्थळी तोडमोड करून प्रकाश झा यांच्यावर शाई फेकली.तेथे उपस्थित काहीजणांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केले असून यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन हैदोस घालताना दिसत आहेत. यावेळी एकाला मारहाण केली जात असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
हिंदूंची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दलाने या वेबसीरिजचे चित्रीकरण चालू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. या वेब सीरिजचं नाव बदलण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा