Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

आज आपल्या देशातील जातीयवाद संपलाय का?:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
 आज आपल्या देशातील जातीयवाद संपलाय का?:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दोन दिवशीय डिसमॅलटिंग कास्टीजम: लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेंशीयल ऑफ हिंदुत्व या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

माझ्याकडे खुप काही इतिहासाचे ज्ञान आहे असे काही नाही. लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेंशीयल ऑफ हिंदुत्व या गोष्टीचा अभ्यास स्वातंत्रप्राप्तीनंतर तात्काळ होणे गरजेचे होते. पण देर आये दुरुस्त आहे. हा चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे. आपण जे काही आहोत त्यात आपल्या पूर्वजांचे मोठे योगदान आहे. एक काळ होता की आपल्या देशवासियांना खुप संघर्ष करावा लागला. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. स्वामी विवेकानंद यांची मी पुस्तके वाचलीत. कॉलेज जीवनात इंग्रजी पुस्तके वाचली. त्यावेळी मला असे वाटायचे की हिंदू हिंदू ची बात का चालली आहे. मी लाहनपणापासूनच महात्मा गांधीजींचा आदर करत होतो. मी ज्यावेळी संघात जायला लागलो. त्यावेळी एक तिथले अधिकारी भेटले. त्यावेळी समजले. की आपल्या देशात कुठची बाहेरची समस्या नाहिये. या देशात समस्या हिंदू आहे. कारण तो स्वत:ला ओळखत नाहिये. त्यामुळे भेदभाव निर्माण झाले. इथे समस्या कुठची दुसरी नाहिये. हिंदी हिंदीचे दुश्मन आहेत. हे इंग्रजी बोलतात. मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. यांना हिंदी बोलायला लाज वाटते. आज आपल्या देशाला आवश्यकता आहे ती आपल्या स्वतःला ओळखण्याची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी खुप मोठे योगदान दिले आहे. आपल्या देशात काही प्रयत्न होताहेत का की प्रत्येक घरात विज मिळतेय तिथे जातीपातीचा भेद आहे का?, विज, पाणी, रस्ते मिळत असताना जातीपातीचा धर्माचा भेद आहे का? विना पैसे बँकेत खाते खोलताना बँकेत भेदभाव केला गेलाय काय?. मी काही सरकारचा प्रचार करायला नाही आलोय. आज गावागावात विकासाची चर्चा होतेय. जिथे चांगली कामे होत आहे. तिथे काही लोक सांगतात की हिंदुत्व थोपावले जातेय. गौरव भारतमातेची पूजा करण्याने होते. धर्म छिनन्याचा प्रयत्न झाला तर देश त्याच्याविरुद्ध उभा राहिल. विर सावरकर यांना ओळखण्यासाठी अभ्यास झाला पाहिजे. सावरकरांची पुस्तके वाचल्यानंतर डोळ्यातून अश्रू येतात. आपण चर्चाच करत राहतो. जे योगदान स्वतंत्रविरांचे आहे. त्याची चर्चा का नाही करत. समाजात जातीयवाद चुकिचा आहे. आपण आजची परिस्थिती पाहता आपण असे म्हणू शकतो का की जातीयवाद संपलाय? देशात जाती जातिंमध्ये वर्गवारी आहे. उच्च नीच भेदभाव आहे. सावरकरांनी बेटी बंदी, रोटी बंदी या विषयांवर अभ्यास केला. चिंतन केले. कुणी सांगते जातीय गणना करण्यात यावी. महाराष्ट्रात अनेक जाती आहेत. गावोगावी वेगवेगळ्या जाती. मला वाटते की पन्नास हजार जाती महाराष्ट्रातच असतील. आणि त्यांची गणना करा? आणखी काही राहिले नाही का करण्यासारखे? आपल्या देशाला पुढे जायचे आहे. जातीपातींचा भेदभाव संपवायचा आहे. अस्पृश्यता संपवायची आहे. नेहरु देहराडूनच्या जेल मध्ये होते तिथे डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहत होते. पू-या देशात फिरत होते. परंतू सावकरांना अंदमानातून रत्नागिरित आल्यावर बाहेर फिरायला बंदी होती. पण सावरकर म्हणाले की मी इथेही जनजागृतीचे काम करणारच. रत्नागिरीत आल्यावर पतित पावन मंदिर उभारून एक नविन परंपरा सुरु केली. नविन क्रांती सुरु केली. सध्या जनजागृतीचे सतत प्रयास झाले पाहिजेत. आपण स्वतःच उदाहरण बनून प्रयास झाले पाहिजेत. या सेमिनार च्या माध्यमातून आणखी विचारांना बळ मिळेल असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कार्यक्रमात व्यक्त केले. 

रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दोन दिवशीय डिसमॅलटिंग कास्टीजम: लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेंशीयल ऑफ हिंदुत्व या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे राज्यपाल उपस्थीत होते. 

या कार्यक्रमावेळी भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद, नवी दिल्लीचे सदस्य व जे.एन.यू.चे प्राध्यापक उमेश कदम, भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद, नवी दिल्लीच्या सदस्य सचिव प्रा.के.रत्नम, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे रणजित सावरकर, नवी दिल्लीचे सेंट्रल इन्फोर्मेशन कमिशनर उदयसिंह माहुरकर, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय सेंट्रल युनिव्हर्सिटीचे प्रा.रजनीश कुमार शुक्ला त्यानंतर प्रा.अशोक मोडक, डॉ.नुपुर सिंग, माजी आमदार बाळ माने, अॅड.बाबासाहेब परुळेकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिल्पाताई पटवर्धन, सतीष शेवडे आदी उपस्थीत होते


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा