नशेबाज,अमली पदार्थ विक्रेत्यांवर करडी नजर
सहा महिन्यात दीड कोटींचे अमली पदार्थ जप्त
पुणे : शिक्षणाचे माहेरघर तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुण्यात मोठय़ा संख्येने परप्रांतीय युवक-युवती वास्तव्यास आहेत. परप्रांतीय नोकरदार तसेच युवकांना नशेच्या जाळ्यात ओढळणाऱ्या अमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून गेल्या काही वर्षांत अमली पदार्थ विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याने नशेबाजीला चाप बसला आहे. गेल्या सहा महिन्यात पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एक कोटी ४४ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून ५५ जणांना गजाआड केले आहे.
शहरात नोकरी तसेच शिक्षणासाठी आलेल्या परप्रांतीय युवक-युवतींना जाळ्यात ओढून त्यांना अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सराइतांच्या हालचालीवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. अमली पदार्थ विक्रेते तसेच तस्करांची माहिती काढण्यात येत आहे. शहरात कोकेन, गांजा, चरस, मेफे ड्रोन, ब्राऊनशुगर, अफू, एलएसडी अशा अमली पदार्थाची विक्री केली जाते. अमली पदार्थ विक्रेते ओळखीशिवाय अमली पदार्थाची विक्री करत नाहीत. गेल्या काही वर्षांंपासून अमली पदार्थाचे तस्करी आणि विक्री प्रकरणात शहरात शिक्षणासाठी आलेले नायजेरियन युवक सक्रिय आहेत. नायजेरियन युवक शिक्षण तसेच व्यावसायिक व्हिसा मिळवून देशात येतात. पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू या शहरात नायजेरियन अमली पदार्थ विक्रेते सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना आहे.
नायजेरियन तसेच स्थानिक अमली पदार्थ विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याने अमली पदार्थ विक्रीला आळा बसला आहे. शहरातील पबमध्ये जाऊन पोलिसांकडून नियमित तपासणी करण्यात येते, तसेच पाटर्य़ावर नजर ठेवण्यात येत आहे.
शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांची यादी
अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची यादी पोलिसांनी तयार केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अमली पदार्थ विक्रेत्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्या विरोधात नियमित कारवाई करण्यात येत असल्याने अमली पदार्थ विक्रीला आळा बसला आहे. गेल्या सहा महिन्यात एक कोटी ४४ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या चार कोटी ३६ लाख रुपयांचे अमली पदार्थ काही महिन्यांपूर्वी खासगी कंपनीच्या भट्टीत जाळण्यात आले.
जनजागृती आणि समुपदेशन
करोनाच्या संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. अमली पदार्थाचे सेवन न करण्यासाठी पोलिसांकडून नियमित शहरातील विविध महाविद्यालयात व्याख्याने आयोजित केली जातात. जनजागृती मोहिमेत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या युवकांचे समुपदेशनही करण्यात येते. नायजेरियन अमली पदार्थ तस्करांच्या हालचालीवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकातील (पथक -एक)पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले. अमली पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याने अमली पदार्थ विक्रीला आळा बसला असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकातील (पथक -दोन) पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी नमूद केले.
तरुणाईला ‘म्याव म्याव’चा विळखा
पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरूसह देशातील सर्व मोठय़ा शहरात मेफ्रेडोन नावाचा अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अमली पदार्थ तस्कर तसेच नशेबाज युवक सांकेतिक भाषेत मेफे ड्रोनला ‘म्याव म्याव’ म्हणतात. तीन वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्य़ातील एका रासायनिक कंपनीत मेफ्रेडोन तयार करण्यात आल्याचा प्रकार मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने उघडकीस आणला होता. या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर मेफे ड्रोन जप्त करण्यात आले होते.
....................................
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा