
रत्नागिरी जिल्हा परिषदेत कामांसाठी येणा-या ग्रामस्थांना खुर्चिप्रमाणे गोल गोल फिरवू नये, नाहितर पाच वर्षांनी तेच आपल्याला फिरवतील: मंत्री उदय सामंत
रत्नागिरी पंचायत समितीच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना युनिक कार्डचे वाटप
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी पंचायत समितीच्या वतीने कै.शामराव पेजे सभागृहात दिव्यांग लाभार्थींना युनिक कार्ड (वैश्विक ओळखपत्र) वाटप सोहळ्याचे गुरुवारी सकाळी दहा वाजता आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की दिव्यांगांसाठी कार्यक्रम करुन आमची जबाबदारी संपली नाही. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. संपुर्ण अपंगांची नोंदणी आजमितीस आपल्याकडे नाही. प्रत्येक पंचायत समितीने अपंग नोंदणीबाबत उपक्रम राबवले पाहिजेत. जिल्ह्यातील अपंगांना विशेषत: अर्धांगवायुचा आजार असलेल्या लोकांना सीव्हील हॉस्पिटलमध्ये लाभ दिला जात नाही. तिथे उलट सुलट नियम सांगितले जातात. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी स्वत: हून नियम बनवले असतील तर ते आम्ही पाहू. त्यांना आम्ही आवश्यक त्या सुचना देऊ. दिव्यांग विद्यार्थ्यांची विद्वत्ता मोठी आहे. दिव्यांगांसाठी पोस्ट कोव्हिडचा त्रास होऊ नये म्हणून मुंबईत शिबिर घेण्यात आले होते. दिव्यांग व्यक्तींकडे प्रशासनाने सकारात्मक बाजुने बघितले पाहिजे. नियम बाजुला ठेवले पाहिजेत. प्रकृतीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. अशा व्यक्तींची चेष्टा होऊ नये. प्रांत, तहसिल कार्यालय यांनी अपंगांचे पहिले काम झाले पाहिजे, त्यांना रांगेत तासनतास उभे राहण्याची वेळ येऊ नये. ज्या लोकांना कार्ड दिलेय त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या दिव्यांग व्यक्तींकडे अथवा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष झाले तर त्यांचे शाप कुणी घेऊ नये. या मताचा मी आहे. रत्नागिरी पंचायत समितीने रत्नागिरी तालुका दिव्यांगांसाठी कसा वेगळा तालुका आहे हे दाखवून द्यावे.
यापुढे मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी पंचायत समितीच्या नूतन वास्तुचा भूमिपुजनाचा कार्यक्रम कदाचीत 12 तारखेला होईल. या इमारतीसाठी सुमारे 9 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषद इमारतीला 60 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये सगळ्या चांगल्या दर्जाच्या भौतिक सुविधाही असतील. गोल गोल फ़िरणा-या खुर्च्याही असतील. हे सगळे होत असताना जिल्हाभरातून कामांसाठी येणा-या ग्रामस्थांना आपण खुर्ची प्रमाणे गोल गोल फिरवू नये. नाहितर तेच लोक पाच वर्षांनी आपल्याला फिरवतील. त्याचप्रमाणे येथे अधिकारी आणि लोकप्रतिनीधी संघर्ष असून उपयोगाचा नाही. अधिका-यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हे सर्वांनाच समजले पाहिजे. विकासापासून वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या कार्यक्रमावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष बंड्या साळवी, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, पंचायत समिती सभापती संजना माने, उपसभापती ऊत्तम सावंत, पंचायत समिती सदस्य, प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, गटविकास अधिकारी टी.बी.जाधव, आस्था फाऊंडेशनच्या सचिव सुरेखा पाथरे आदी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती स्तरावरिल सरपंच समिती व तालुक्यातीप सरपंच संघटनेच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
....................................... .
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा