' महामानव ' महाकाव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा साजरा
संगीता जांभळे, नाशिक रोड
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनदर्शन काव्यातून अधोरेखित करणारा 'महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर' हा काव्यग्रंथ सन्माननीय यशवंत चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू प्रा.डॉ.इ.वायुनंदन यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा साजरा झाला.
नांदेड येथील प्रा.अशोककुमार दवणे यांनी १ जानेवारी २०२१ रोजी एक संकल्प केला होता. २०२१ या वर्षामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीनवावरील २०२१ कवींच्या २०२१ कवितांचा २०८४ पानांचा महाकाव्यग्रंथ तयार करुन, १४ एप्रिल २०२१ रोजी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार होते. परंतु कोरोना महामारीमुळे वरील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. दि.२० ऑक्टोबर २०२१ रोजी या काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू मा. प्रा.ई.वायुनंदन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्त विद्यापिठाच्या दालनात साजरा झाला. २० ऑक्टोबर २०२१ रोजी वरील ग्रंथाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील ११ विद्यापिठात व सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला. या महाकाव्यग्रंथात नाशिक जिल्ह्यातील ७४ कवींच्या कवितांचा समावेश आहे. यात प्रज्ञा निकम , नयन धारणकर, प्रा. शरद शेजवळ, रविकांत शार्दूल इत्यादी कवींच्या कवितांचा समावेश आहे. वरील कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुनिल बर्वे, प्रा.गंगाधर अहिरे, बापूसाहेब सोनवणे, प्रा. स्वप्निल गरुड, गणेश पवार, उमा परदेशी, शिवाजी पगारे, भावना सोनवणे, आदिती सोनवणे,जेष्ठ पत्रकार प्रविण नेटावणे व जितेंद्र नरवडे आदी उपस्थित होते.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा