Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

पर्यटक पाहिजेत; सुविधांच्या नावाने बोफ्लबाबोफ्लब!

 पर्यटक पाहिजेत; सुविधांच्या नावाने बोफ्लबाबोफ्लब!


रस्ते, पाणी, स्वच्छता मुलभूत सुविधांचा अभाव तरीही गणपतीपुळे ग्रा.प.च्या करामध्ये भरडतात पर्यटक

दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- गणपतीपुळे ग्रा.प. येणाऱ्या पर्यटकांकडून स्वागत कर आकारते. या मोबदल्यात स्वच्छता, पाणी, स्वच्छतागृहे या सर्वांचेच आबाळ झाली आहे. पर्यटनस्थळ म्हणून राज्यात विकास पावावा म्हणून शर्थीचे प्रयत्न सर्व करत आहेत. परंतु, सत्ता कोणाचीही असो गणपती बाप्पाच्या गावात मुलभूत सुविधांची मात्र बोफ्लबाबोफ्लब झाली आहे.

काल संकष्टी निमित्त 7 हजाराच्या वर पर्यटक आले. पर्यटक सकाळी येतात व संध्याकाळी निघून जातात. करोडो रुपये खर्च करुन स्थानिक ग्रामस्थांनी उद्योग उभे केले आहेत. परंतु, पर्यटक निवास करु शकतील किंवा आपला मुक्काम वाढवू शकतील असे सध्यातरी काही चित्र दिसत नाही. सरकारे बदलतात, घोषणा होतात, कोकणच्या नशीबी मात्र काहीच मिळत नाही.

नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा सी वर्ल्ड चा प्रकल्प मंजुर झाला. असे हजारो प्रकल्प फक्त मंजुर झाले. पण दुसऱ्या बाजुला दिसले काहीच नाही. कोकणात बरेच तांत्रिक - मांत्रिक आहेत पण जादुची छडी चालवून कोकणाचे पर्यटन वाढवण्याचे व टिकवण्याचे या मांत्रिकांना मात्र जमले नाही. हे मांत्रिक राजकीय लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल सल्ला देतात. देवाची करणी व पर्यटकांच्या हाती फक्त धुपाटणी, अशीच अवस्था आज पहायला मिळते. इतकेच काय कोट्यावधी रुपये खर्च करुन उभे असलेली काही पर्यटनस्थळे अवघ्या दोन-चार वर्षातच गायब झालेली दिसत आहेत. इतके पैसे खर्च करुन गार्डन, तटबंदी व सजावट कुठे गायब झाली, हे सांगायला कोण्या ज्योतिषीची गरज नाही. कोकणी जनता माका काय करायचा हाय!  या एकमेव उदासिनतेपायी कोकणातील सर्वच पक्षातील नेत्यांनी मुंबर्इत हायफाय संस्कृती आपला बिस्तारा गुंडाळला. आम्ही मात्र दर पाच वर्षांनी कोकणचा 

कॅलिफोर्निया होण्याची वाट वाहतो आहेत. इलेक्शन आले की थातुर-मातुर उद्घाटने, घोषणा व आमच्या नशीबी मात्र वर्षानुवर्षांचा वनवास. 

नवी पिढी सजग व सुशिक्षीत आहे. आपली कुपमंडुक मानसिकता सोडुन खेकडा प्रवृत्ती बाळगणाऱ्या सर्वांना बाजुला करुन पक्ष, धर्म या पलिकडे कोकणच्या निसर्गाचा जीवंत अनुभव जगाला देण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. व कोणीही भाग्यविधाता किंवा मुख्यमंत्री, पंतप्रधान येवून कोकणचा विकास होर्इल ही वेडी आशा सोडून आपल्याला आपल्या भविष्यासाठी पुढे आले पाहिजे. कोणत्याही पक्ष किंवा राजकारणावर टिका न करता विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र झाले पाहिजे. तर व तरच कोकणचे भाग्य बदलण्याची संधी आहे. कोकण पर्यटन, ॅव्हल्स व्यवसाय, हॉटेल, लॉजिंग, टुर ऑपरेटर या सर्वांना मंगलनिनाद या रत्नागिरी कन्या, मँगो गर्ल पूर्वा किणे यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. भारतातील सर्व टूर ऑपरेटरर्स यांना केोकणचे सौफ्लदर्य परिचित करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे अवघ्या 1200 रुपयांत प्रोफेशनल व्हिडियो ॲडव्हटार्इज, शुटींग, एडिटींग व व्हॉर्इस अोव्हरसह टुरिस्ट व्यवसायिकांना करुन देण्याचे व्रत घेतले आहे. जेणेकरुन ऑनलार्इन सर्च केल्यानंतर येथील सुविधा जगभरातील पर्यटकांना समजल्या पाहिजेत.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा