
मराठा आरक्षणाला खीळ घालण्याचे पाप भाजपने केले – धनंजय मुंडे
वाडेगव्हाण येथील ७ कोटी ७९ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले
तालुक्यातील वाडेगव्हाण येथील ७ कोटी ७९ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मंत्री मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार दादाभाऊ कळमकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार नीलेश लंके, अशोक सावंत, बाबाजी तरटे, उद्धव दुसुंगे, सुदाम पवार, सुरेश धुरपते, सुनंदा धुरपते, राजश्री कोठावळे, पूनम मुंगसे, विक्रम कळमकर आदि उपस्थित होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ५५ वर्षांचा सामाजिक, राजकीय प्रवास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले काम त्यांनी केले असल्याचे दिसून येते. अठरा पगड जातीच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महिलांना संधी दिली असल्याचे मंत्री मुंडे म्हणाले.
विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने वाडेगव्हाण येथे मोठे शक्तिप्रदर्शन केले. चार महिन्यांनी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या गावात शक्तिप्रदर्शन करून राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचे मानले जाते.
शनिवारी दुपारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार लंके यांच्या घरी भेट दिली. वारकऱ्याच्या घरी साक्षात विठ्ठल आला असेच या प्रसंगाला म्हणावे लागेल. आमदार लंके यांनी ज्या काळात माणुसकी हरवली होती त्या काळात करोना रुग्णांना माणुसकी दाखविली. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये माणुसकी जागविली. कोणी कितीही, काहीही करू द्या या मतदार संघात नीलेश लंके सोडून काहीच होणार नाही. माझ्या विभागाकडून इतरांपेक्षा काकणभर जास्त निधी देण्याचा शब्द मी देतो.
– धनंजय मुंडे,
सामाजिक न्यायमंत्री.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा